'वेलडन बेबी' चित्रपटाच्या शुटिंगसाठी अमृता खानविलकर लंडनमध्ये
Amruta khanvilkar (pc - instagram)

मराठी तसेच हिंदी चित्रपटात आपला ठसा उमठवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असते. अमृता सध्या लंडनमध्ये (london) शुटिंगदरम्यान व्यग्र आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लंडनमधील फोटो शेअर केले आहेत.

अमृता सध्या पुष्कर जोगसोबत 'वेलडन बेबी' (Well Done Baby) या चित्रपटाची शुटिंग करत आहे. अमृताच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेंट केले आहे. अमृता आपल्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमी चर्चेत असते. अमृताने मालिका, डान्स रिअॅलिटी शोसह हिंदी आणि मराठी सिनेमातही काम केले आहे. (हेही वाचा - Ranu Mondal ला झाली आहे 'ग' ची बाधा; चाहतीने हात लावल्यावर तिच्यावरच डाफरली)

अमृता खानविलकर इन्स्टाग्राम अकाऊंट - 

 

View this post on Instagram

 

#amuinlondon #workmode @helo_marathiofficial

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

अमृता खानविलकर 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'जिवलगा' मालिकेतून पहिल्यांदा मालिकेत झळकणार होती. गोलमाल, साडेमाडे तीन, नटरंग, झकास, धुसर, फक्त लढ म्हणा, सतरंगी रे, बाजी, आदी चित्रपटात तिने उत्तम भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

🍁 #amuinlondon

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

हेही वाचा - मराठी रंगभूमी दिन निमित्त 'ही' पाच चर्चेतील धम्माल मराठी नाटकं आवर्जून पाहा

 

View this post on Instagram

 

Say #helo to my amazing costar #vandanagupte ( vandumaushi ) @helo_marathiofficial

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

अमृता लवकरच 'पॉन्डेचेरी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर करणार आहेत. या चित्रपटाची कथा कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी लिहली आहे. या चित्रपटात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांची मुख्य भूमिका असणार आहे.