‘भाई -व्यक्ती की वल्ली' उत्तरार्ध सिनेमामधून 'नाच  रे मोरा' गाणं पुन्हा नव्या अंदाजात (Video)
Nach Re Mora Song (Photo Credits: Instagram

Bhaai Vyakti Ki Valli - Uttarardha Song Nach Re Mora: 'नाच रे मोरा' हे गाणं ठाऊक नाही अशी मराठी व्यक्ती सापडणं जरा विरळच आहे. लहानपणी अभ्यासक्रमातून ते अगदी रेडिओ आणि टेलिव्हिजन शोमधून हे गाणं अनेकांनी ऐकलं असेल पण 'भाई व्यक्ती की वल्ली' (Bhaai Vyakti Ki Valli -Uttarardha ) या सिनेमातून पहिल्यांदाच हे गाणं एका नव्या अंदाजात रसिकांच्या समोर आलं आहे. बाबा आमटे (Baba Amte) यांच्या 'आनंदवना'तील एक आठवण म्हणून हे गाणं सिनेमामध्ये चित्रित करण्यात आलं आहे. नुकतच सोशल मीडियाच्या माध्यमातून या गाण्याची झलक रसिकांसोबत शेअर करण्यात आली आहे. Bhaai - Vyakti Kee Valli Part 2 Trailer: पुरूषोत्तम देशपांडे, महाराष्ट्राचे 'पुलं' कसे झाले? हा प्रवास 'भाई' च्या उत्तरार्धात उलगडणार

'नाच रे मोरा' हे मूळ गाणं  आशा भोसले यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं होतं. ग.दि. माडगूळकर यांनी या गाण्याचे शब्द लिहले असून पु ल देशपांडे यांनी या गाण्याची चाल बांधली आहे.  मात्र ‘भाई -व्यक्ती की वल्ली' उत्तरार्ध सिनेमामध्ये हे गाणं अजित परब याने गायलं आहे. अजितनेच 'भाई' सिनेमासाठी हे गाणं पुन्हा बनवलं आहे.

सिनेमामध्ये आनंदवनात तेथील मुलांसोबत पुल देशपांडे या सिनेमात खास परफॉर्म करताना दाखवण्यात आलं आहे. पुलं देशपांडे यांच्या मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता सागर देशमुख झळकत आहे. तर अभिनेत्री इरावती हर्षे या सिनेमात सुनिती देशपांडे यांची भूमिका साकारत आहे. ‘भाई -व्यक्ती की वल्ली' उत्तरार्ध हा सिनेमा 8 फेब्रुवारी 2019 दिवशी प्रदर्शित होणार आहे.