मराठी अभिनेते रामचंद्र धुमाळ (Ramchandra Dhumal) यांचे आज (25 मे) पुण्यामध्ये निधन झाले आहे. दरम्यान 71 वर्षीय धुमाळ मागील काही दिवसांपासून आजारी होते. आज प्राणज्योत मालवली. दरम्यान मराठी, हिंदी सिनेमा वेब सीरीजमधून ते रसिकांच्या भेटीला आले. फँड्री, ख्वाडा, सैराट, म्होरक्या यासारखे मराठी सिनेमे तर ‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Games) मध्येही त्यांची झलक पहायला मिळाली. नेटफ्लिक्स वरील ‘सेक्रेड गेम्स’या लोकप्रिय सीरीज मध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने साकरलेल्या गणेश गायतोंडे या पात्राच्या वडिलांची भुमिका रामचंद्र धुमाळ यांनी साकारली होती. 'भाडिपा' या युट्युब चॅनलवरही त्यांनी तरूण मराठी कलाकारांसोबत काम केले होते. भाडिपाच्या सारंग साठ्ये याने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून रामचंद्र धुमाळ यांच्या निधनाचे वृत्त देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मिलिंद जोग यांनी देखील रामचंद्र धुमाळ यांना आदरांजली व्यक्त केली.
रामचंद्र धुमाळ यांनी 100 पेक्षा अधिक मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’या मराठी विनोदी सिनेमामधील त्यांची भूमिका विशेष गाजली.
सारंग साठ्ये याची पोस्ट
RIP धुमाळ काका ! आम्ही तुम्हांला विसरणार नाही. आम्हांला माफ करा आम्ही तुम्हांला अंतिम अलविदा म्हणायला येऊ शकत नाही. तुम्ही खूप काही मिळणं अपेक्षित होतं. अशी भावनिक पोस्ट सारंग साठ्येने लिहली आहे.
रामचंद्र धुमाळ यांच्या पश्चात पत्नी आणि 3 मुलं असा परिवार आहे. दरम्यान मराठी सिनेसृष्टीमध्ये त्यांची ओळख वास्तववादी अभिनेते म्हणून होती.