महाराष्ट्रात कोरोनाचा फास दिवसेंदिवस अधिकाधिक आवळत चालला असताना दुसरीकडे कोरोना लसीचा देखील तुटवडा आहे. तसेच लसीकरणासाठी (Corona Vaccine) नागरिकांच्या रस्त्यांवर भर उन्हात लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. मुंबईतील हे दृश्य पाहून मराठी अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) याने याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्याने आपल्या ट्विटर पेजवर गोरेगाव मध्ये लसीकरणासाठी रांगा लावून उभे असलेल्या नागरिकांचे फोटो शेअर केले आहेत. ही परिस्थिती पाहून राज्यात 'महासत्ता नाही महाथट्टा नक्की झालीय' अशा शब्दांत टिका केली आहे.
"सर्व नियम पाळणारा... सरकार ला प्रामाणिक पणे टॅक्स भरणारा... या देशावर प्रचंड प्रेम असणारा माझा सामान्य माणुस आत्ता आरोग्य सुविधांसाठी (जगण्यआसाठी) रांगेत उभा आहे! उन्हा-तान्हाचा कुठल्याही सावली शिवाय... खूप वय असलेला, थकलेला! आत्ता नेस्को (गोरेगाव, मुंबई) बाहेर लांब रांग!" अशी हेमंत ढोमे याने ट्विट केले आहे.हेदेखील वाचा- 'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड
सर्व नियम पाळणारा... सरकार ला प्रामाणिक पणे टॅक्स भरणारा... या देशावर प्रचंड प्रेम असणारा माझा सामान्य माणुस आत्ता आरोग्य सुविधांसाठी (जगण्यआसाठी) रांगेत उभा आहे! उन्हा-तान्हाचा कुठल्याही सावली शिवाय... खूप वय असलेला, थकलेला! आत्ता नेस्को (गोरेगाव, मुंबई) बाहेर लांब रांग! pic.twitter.com/P08ELQOMH4
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) April 24, 2021
"कमीत कमी 1 किमी तरी... हजारो लोक आहेत! गेटवर चेंगरा चेंगरी... social distancing चा पत्ता नाही! एवढं करून #vaccine मिळेल की नाही हे सुद्धा माहित नाही... सारी व्यवस्था कोलमडलीय... माणसाला माणसासारखं तरी वागवा... महासत्ता होणार म्हणे... महाथट्टा नक्कीच झालीय..." असंही तो पुढे म्हणाला.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील राजकारणावर सोशल मिडियाद्वारे परखडपणे टिका केली होती. औषधे, ऑक्सिजन यांचा अपुरा पुरवठा, यामध्ये होत असलेले राजकारण हे लोकांना उघडरित्या दिसत आहे. या सर्वांवर टिप्पणी करत मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने देशातील घाणेरड्या राजकारणावर भाष्य केले आहे.
आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, "सगळ्यात मोठी “कीड” जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे “राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या “कीड”पासून बचाव करता आला तर बघा! ..अवघड आहे सगळंच…काळजी घ्या."