Gaurav More Post On Dr Babasaheb Ambedkar: बाबासाहेबांच्या जयंतीदिनी 'तो' फोटो शेअर करत गौरव मोरेची खास पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त (Dr Babasaheb Ambedkar Jayanti) देशभरातल्या जनतेमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. सध्या सोशल मीडियासह सर्वत्र एकमेकांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. महाराष्ट्राची  हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे (Gourav More) याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खास पोस्ट करत त्यांना अभिवादन केलंय. काही वर्षापुर्वी गौरव मोरेने लंडनमधील (London) बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या वास्तूला भेट दिली होली तो फोटो गौरव मोरेने पोस्ट केला आहे. (हेही वाचा - Ambedkar Jayanti 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दादर स्थित चैत्यभूमी परिसराचे मनोहारी विहंगम दृश्य, पहा व्हिडिओ)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

अभिनेता गौरव मोरेने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “हीच ती खुर्ची आणि टेबल ज्याच्यावर बसुन बाबासाहेबांनी लंडनमध्ये अभ्यास केलेला त्या पवित्र वास्तुला २०२२ साली भेट दिली होती. आज १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती. थँक्यू बाबासाहेब तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही...”  गौरवच्या ह्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.

33 हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले असून हजारो चाहत्यांनी कमेंट्स केलेल्या आहे. गौरव मोरेला हास्यजत्रेतून फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्याला हास्यजत्रेतून 'फिल्टर पाड्याचा बच्चन' म्हणून ओळख मिळाली आहे. गौरव हास्यजत्रा व्यतिरिक्त इतर प्रोजेक्ट्स मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गौरव मोरे गेल्या वर्षी 'अंकुश', 'बॉइज 4', 'सलमान सोसायटी', 'लंडन मिसळ' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.