पांघरुण (संग्रहित संपादित प्रतिमा)

मराठी चित्रपट व्यवसायाला मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने 1962 पासून चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाला सुरवात केली आहे. मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना उत्तेजन देण्याच्या हेतूने प्रतिवर्षी मराठी चित्रपट महोत्सवाचे भव्य स्वरुपात आयोजित करण्यात येते. 57 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन-तीन नामांकनांची शिफारस तसेच 7 तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

अंतिम फेरीसाठी पांघरुण, ताजमाल, आनंदी गोपाळ, बाय (Y), बार्डो, प्रवास, मिस यु मिस्टर,बस्ता, स्माईल प्लीज, बाबा या दहा चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे.  प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करिता माईघाट, मनफकिरा, झॉलीवूड या तीन चित्रपटांचे आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी घोडा, वेगळी वाट, आटपाडी नाईटस् यांचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षात चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते.  दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 89 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका 57 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून रमेश साळगांवकर, अरुण म्हात्रे, किशू पाल,  श्रीरंग आरस, प्रशांत पाताडे, विजय कदम,  मनोहर आचरेकर, जयवंत राऊत, प्रदीप पेडणेकर, नंदू वर्दम,  प्रकाश जाधव, रमेश मोरे, कुमार सोहनी आणि दिलीप ठाकूर यांनी काम पाहिले. (हेही वाचा:  ‘ठेच’मधून उलगडणार प्रेमत्रिकोण! ‘या’ दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला)

घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबंधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत मे 2022 मध्ये समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील. पुरस्कार तसेच नामांकन प्राप्त सर्व कलाकार, तंत्रज्ञांचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. 

57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव 2019

अंतिम घोषित पारितोषिके

तांत्रिक विभाग  बालकलाकार

अ.क्र. विभाग पारितोषिक प्राप्त नाव चित्रपट
1 उत्कृष्ट कला दिग्दर्शनकै.साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक रु. 50,000/- व मानचिन्ह श्री. सुनील निगवेकरश्री. निलेश वाघ आनंदी गोपाळ
2 उत्कृष्ट छायालेखनकै. पांडूरंग नाईक पारितोषिक

रु. 50,000/- व मानचिन्ह

श्री. करण बी. रावत पांघरुण
3 उत्कृष्ट संकलनरु. 50,000/- व मानचिन्ह श्री. आशिष म्हात्रेश्रीमती. अपूर्वा मोतीवाले बस्ता
4 उत्कृष्ट ध्वनीमुद्रणरु. 50,000/- व मानचिन्ह  श्री. अनुप देव माईघाट
5 उत्कृष्ट ध्वनीसंयोजनरु. 50,000/- व मानचिन्ह  श्री. मंदार कमलापूरकर त्रिज्या
6  उत्कृष्ट वेशभूषारु. 50,000/- व मानचिन्ह श्री. विक्रम फडणीस स्माईल प्लीज
7             उत्कृष्ट रंगभूषारु. 50,000/- व मानचिन्ह श्रीमती. सानिका गाडगीळ फत्तेशिकस्त
8 उत्कृष्ट बालकलाकारकै. गजानन जहागिरदार पुरस्कार आणि

रु. 50,000/- व मानचिन्ह

श्री. आर्यन मेघजी बाबा

 

57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव 2019

नामनिर्देशन

अ.क्र. विभाग नामनिर्देशन चित्रपट
1. सर्वोत्कृष्ट कथाकै.मधुसूदन कालेलकर

पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह

1.     बा.भ. बोरकर पांघरुण
2.   मनीष सिंग बाबा
3.   पुंडलिक धुमाळ   पेन्शन
2. उत्कृष्ट पटकथापारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह 1.    नियाज मुजावर ताजमाल
2.   समीर आशा पाटील बोन्साय
3.   विक्रम फडणीस               इरावती कर्णिक

 

स्माईल प्लीज
3. उत्कृष्ट संवादकै.आचार्य अत्रे पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

1.    इरावती कर्णिक आंनदी गोपाळ
2.   श्वेता पेंडसे बार्डो
3.   नियाज मुजावर ताजमाल
4. उत्कृष्ट गीतेकै.माडगूळकर पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

1.गीत-आभाळासंग मातीचं नांदणं       संजय कृष्णाजी पाटील  हिरकणी
2.गीत- रान पेटलं          श्वेता पेंडसे बार्डो
3.गीत- ही अनोखी गाठ           वैभव जोशी पांघरुण
5. उत्कृष्ट संगीतकै.अरुण पौडवाल

पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

1.    ऋषिकेश-जसराज- सौरभ आनंदी गोपाळ
2.   रोहन रोहम स्माईल प्लीज
3.   अमित राज हिरकणी
6. उत्कृष्ट पार्श्वसंगीतरु.50,000/- व मानचिन्ह 1.    सौरभ भालेराव आनंदी गोपाळ
2.   प्रफुल्ल स्वप्नील स्माईल प्लीज
3.   हितेश मोडक पांघरुण
7. उत्कृष्ट पार्श्वगायकरु.50,000/- व मानचिन्ह 1.     गीत-मम पाऊली               ऋषिकेश रानडे आनंदी गोपाळ
2.   गीत-येशील तू     सोनू निगम मिस यु मिस्टर 
3.    गीत- गार गार थेटरात               जसराज जोशी गर्लफ्रेंड
8. उत्कृष्ट पार्श्वगायिकारु.50,000/- व मानचिन्ह 1.    गीत- मम पाऊली                  आनदी जोशी आनंदी गोपाळ
2.   गीत- रान पेटलं                 सावनी रविंद्र बार्डो
3.   गीत- आभाळसंग मातीचं नांदन                 मधुरा कुंभार  हिरकणी
9. उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शकरु.50,000/- व मानचिन्ह 1.    लव स्टोरी               राहुल – संजीव गर्लफ्रेंड
2.   परिणीती आसमंती              चिन्नी प्रकाश वन्स मोअर
3.   राज्याभिषेक गीत               सुभाष नकाशे हिरकणी
10. उत्कृष्ट  अभिनेताकै.शाहू मोडक पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

श्री शिवाजी गणेशन पुरस्कार

1.    कैलास वाघमारे घोडा
2.   दिपक डोब्रियाल बाबा
3.   ललित प्रभाकर आनंदी गोपाळ
11. उत्कष्ट अभिनेत्रीकै.स्मिता पाटील पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह 1.    भाग्यश्री मिलिंद आनंदी गोपाळ
2.   सोनाली कुलकर्णी पेन्शन
3.   मृण्मयी देशपांडे मिस यु मिस्टर
12. उत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीकै.रत्नमाला पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

1.         शिफारस नाही शिफारस नाही
2.         शिफारस नाही शिफारस नाही
3.        शिफारस नाही शिफारस नाही 
13. उत्कृष्ट विनोदी अभिनेताकै.दामूअण्णा मालवणकर पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह 1.    पार्थ भालेराव बस्ता
      2. शिफारस नाही शिफारस नाही
       3.    शिफारस नाही शिफारस नाही
14. सहाय्यक अभिनेताकै.चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह

 

1.     सुहास पळशीकर बस्ता
2.   रोहित फाळके पांघरुण
3.   संजय खापरे ताजमाल
15. सहाय्यक अभिनेत्रीकै.शांता हुबळीकर व कै.हंसा वाडकर पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह 1.    किरण खोजे ताजमाल
2.   नंदिता पाटकर बाबा
3.   अंजली पाटील मन फकिरा
16 उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेताकै. काशिनाथ घाणेकर पारितोषिक

रु.50,000/- व मानचिन्ह

1.   दिपक काळे झॉलीवूड
      2.    शिफारस नाही शिफारस नाही
       3.   शिफारस नाही शिफारस नाही
17 उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्रीकै.रंजना देशमुख पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह 1.    अक्षया गुरव रिवणावायली
2.   अश्विनी लाडेकर झॉलीवूड
3.   अंकिता लांडे गर्ल्स

 अंतिम फेरीकरीता प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती  प्रथम पदार्पण दिग्दर्शन

अंतिम फेरीकरीत प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती
अ.क्र. चित्रपटाचे नाव चित्रपट संस्थेचे नाव
1. माईघाट अल्केमी व्हिजन 
2. मनफकिरा एस.एन.प्रोडक्शन 
3. झॉलीवूड विशबेरी ऑनलॉईन सर्विस प्रा.लि
प्रथम पदार्पण दिग्दर्शन
  चित्रपटाचे नाव दिग्दर्शकाचे नाव
1. घोडा टी.महेश
2. वेगळी वाट अच्युत नारायण
3. आटपाडी नाईटस् नितीन सुपेकर

 अंतिम फेरीकरीता पुढील दहा चित्रपट 

अ.क्र. चित्रपटाचे नाव
1 पांघरुण
2 ताजमाल
3 आनंदी गोपाळ
4 वाय (Y)
5 बार्डो
6 प्रवास
7 मिस यु मिस्टर
8 बस्ता
9 स्माईल प्लीज
10 बाबा