Thech Marathi Movie: ‘ठेच’मधून उलगडणार प्रेमत्रिकोण! ‘या’ दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘ठेच’ या चित्रपटात देखील प्रेमत्रिकोण ही संकल्पना नव्या दमाच्या कलाकारांसह नव्या पद्धतीनं हाताळण्यात आली आहे. त्यामुळे ‘ठेच’ नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवेल यात शंकाच नाही.

Thech Marathi Movie: ‘ठेच’मधून उलगडणार प्रेमत्रिकोण! ‘या’ दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आगामी ‘ठेच’ या मराठी चित्रपटातून प्रेमत्रिकोणाची कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं असून. येत्या 15 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. लक्ष्मण सोपान थिटे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. प्रेमाचा त्रिकोण ही संकल्पना आजवर चित्रपटात खूप गाजली आहे. ‘ठेच’ या चित्रपटात देखील प्रेमत्रिकोण ही संकल्पना नव्या दमाच्या कलाकारांसह नव्या पद्धतीनं हाताळण्यात आली आहे. त्यामुळे ‘ठेच’ नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवेल यात शंकाच नाही. आई वडील नसलेला शिवा मामाच्या घरी राहून आपलं दहावीचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जातो. तिथे त्याची मैत्री शामबालाशी होते. शामबालाची मैत्रीण पल्लवी ही शिवाला खूप आवडते.

तो मनोमनी तिच्या सोबत आयुष्याची स्वप्न रंगवत असतो. पण, दुसरीकडे शामबाला शिवाच्या प्रेमात पडते. शामबाला शिवाला प्रपोज करण्याअगोदर शिवा शामबालाकडे आपलं पल्लावीवर प्रेम असल्याची कबुली देतो. पण, हट्टी शामबाला शिवाला कसं मिळवायचं, याचा प्लॅन करत असते. शिवाने पल्लवीला मिळवण्यासाठी आणि तिच्या स्वप्नासाठी केलेला रोमांचक प्रवास ‘ठेच’ या चित्रपटातून मांडला आहे. (हे देखील वाचा: Tirsat Marathi Movie: "तिरसाट" चित्रपटातील पाहिल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला)

श्रीनृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘ठेच’ या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सईद मोईन सईद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे. लक्ष्मण सोपान थिटे यांनी चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 26, 2022 04:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).