56 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात Carol Littleton चा मराठमोळा अंदाज ठरला लक्ष्यवेधी; 'भोंगा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
Carol Littleton (Photo Credits: Twitter)

56th Maharashtra State Marathi Film Awards Winners List:मुंबईमध्ये काल (26 मे) दिवशी 56 वा राज्य मराठी चित्रपट सोहळा पार पडला. यंदाचे खास खास आकर्षण होते ते म्हणजे प्रमुख पाहुणे. ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली (John Bailey)आणि एडिटर Carol Littleton यांनी उपस्थिती लावली होती. या रंगतदार सोहळ्यात Carol Littleton यांनी खास मराठमोळ्या वेषभूषेमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे उपस्थितींच्या त्यांच्यावर नजरा खिळल्या होत्या. Carol Littleton यांनी निळ्या रंगाची सिल्क साडी सोबत मानेवर अंबाडा आणि गजरा, नाकात नथ, गळ्यात हार आणि मंगळसूत्र घालत अस्स्सल मराठमोळा अंदाजात सोहळ्याला हजेरी लावली आहे.

56 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये परेश रावल आणि सुषमा शिरोमणी यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी मुक्ता बर्वे आणि के के मेनन यांचा गौरव करण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार 'भोंगा' ला देण्यात आला आहे. वामन भोसले, परेश रावल यांना राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार तर 'भरत जाधव' चा चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार देऊन होणार गौरव

56 वा राज्य मराठी चित्रपट सोहळा पुरस्कार विजेते

 • सर्वोत्कृष्ट कथा - सुधाकर रेडी (नाळ)
 • सर्वोत्कृष्ट पटकथा - शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे ( भोंगा )
 • सर्वोत्कृष्ट संवाद - विवेक बेळे (आपला मानुस)
 • सर्वोत्कृष्ट गीत - संजय पाटील (बंदिशाळा)
 • सर्वोत्कृष्ट संगीत - राजेश सरकाटे ( मेनका उर्वशी)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - विजय गवंडे (बंदिशाळा)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - ऋषिकेश रानाडे ( व्हॉट्सअ‍ॅप लग्न)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - प्रियंका बर्वे (बंदिशाळा)
 • सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक - उमेश जाधव ( मेनका उर्वशी)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता - के.के. मेनन ( एक संगायचाय अन्सेड हॉर्मनी )
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मुक्ता बर्वे (बंदिशाळा)
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता - स्वानंद किरकिरे ( चुंबक )
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री - छाया क़दम ( न्यूड )
 • सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता - फिरोज शेख ( तेंडल्या)
 • सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री - गौरी कोठवदे (पुष्पक विमान)
 • सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती - शांताई मोशन पिक्चर्स ( बंदिशाळा)
 • सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शन - सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर ( तेंडल्या)
 • सर्वोत्कृष्ट चित्रपट - भोंगा

यंदा ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली पहिल्यांदा भारतामध्ये दाखल झाले. त्यांच्याशी बोलताना लवकरच आशियातील ऑस्करचं ऑफिस बॉलिवूड नगरी 'मुंबई' मध्ये सुरू करण्याबाबतही चर्चा झाल्याचं महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे.