राजीव गांधी यांच्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध केल्याने अभिनेता प्रियदर्शन जाधव ट्रोल
Priyadarshan Jadhav (Archived, edited, representative images)

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) चा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. दरम्यान नरेंद्र मोदी (Narendra Modi) विरुद्ध राहुल गांधी (Rahul Gandhi) असा प्रचार सुरू असताना एका जाहीर सभेमध्ये नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर टीका करताना माजी पंतप्रधान आणि राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेचा उधान आले आहे. अनेकांकडून नरेंद्र मोदींच्या विधानावर टीका केली जात आहे. यामध्ये आता मराठी कलाकार प्रियदर्शन जाधवनेही (Priyadarshan Jadhav) आपलं मांडलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून प्रियदर्शनने आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर मोदी समर्थकांकडून प्रियदर्शन सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.

प्रियदर्शन जाधव याचं ट्विट  

प्रियदर्शन जाधव झाला ट्रोल 

ट्विट 1

ट्विट 2

ट्विट 3

ट्विट 4

ट्विट 4

ट्विट 5

उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे बोलताना मोदींनी  तुमचे वडील राजीव गांधी ‘मिस्टर क्लिन’ म्हणून ओळखले जात होते. पण, ‘मिस्टर क्लिन’चा कार्यकाळ हा ‘भ्रष्टाचारी नंबर 1’ म्हणून संपल्याची टीका त्यांनी केली. 19 मे 2019 पर्यंत सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूका होणार आहेत. त्यानंतर 23 मे दिवशी मतमोजणी होणार आहे.