‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ (Man vs Wild) या बेअर ग्रील्सच्या (Bear Grylls) शोमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हजेरी लावणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटकच्या बंदिपूर जंगलामध्ये (Bandipur Forest) रजनीकांतच्या एपिसोडचं शूटिंग सुरू आहे. अद्याप या शोच्या एपिसोडबद्दल फारशी माहिती देण्यात आलेली नाही पण नरेंद्र मोदींच्या एपिसोडप्रमाणेच रजनीकांत यांच्या एपिसोडबद्दलही रसिकांच्या आणि मॅन व्हॅर्सेस वाईल्ड शोच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असेल. सोशल मीडियावर हे वृत्त पसरताच अनेक मजेशीर मीम्स पसरायला देखील सुरूवात झाली आहे.
नरेंद्र मोदींसोबत या पूर्वी भारतामध्ये जीम कॉर्बेटमध्ये ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’चा एपिसोड शूट करण्यात आला होता. साहसी प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता आजमावणार्या या भन्नाट शोमध्ये अनेक साहसी प्रकार पहायला मिळाले आहेत. आता दक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच देशभरात लोकप्रिय असलेले रजनीकांत नेमकं काय करणार? याची उत्सुकता वाढली आहे. Man Vs Wild मध्ये नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांच्यात होतं 'हे' साधर्म्य, Bear Grylls ने शेअर केला अनुभव (Watch Video).
ANI Tweet
#WATCH Actor Rajinikanth arrives at Bandipur forest in Karnataka for a shoot of an episode of 'Man vs Wild' with British adventurer Bear Grylls pic.twitter.com/Eh2Lwd4BAI
— ANI (@ANI) January 28, 2020
अभिनेते रजनीकांत नुकतेच तमिळ चित्रपट 'दरबार' मध्ये झळकले होते. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. आता रजनीकांत हे Thalaivar 168 या अगामी सिनेमासाठी तयारी करत आहेत. या सिनेमामध्ये कीर्ती सुरेश, मीना आणि खुशबू झळकणार आहेत. पण त्या सिनेमापूर्वी रजनीकांत यांचा 'वाईल्ड' अंदाज त्यांच्या रसिकांसमोर येणार आहे.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकींच्या धामधूमीमध्ये आता नरेंद्र मोदींचा एपिसोड झाला होता. 12 ऑगस्ट 2019 दिवशी रात्री 9 वाजता डिस्कव्हरी चॅनेलवर हा एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला होता. दरम्यान रजनीकांत यांच्या पाठोपाठ बॉलिवूडचा खिलाडी स्टार अक्षय कुमार देखील बेअर ग्रील्सच्या शोमध्ये झळकणार असल्याचं वृत्त आहे. नरेंद्र मोदींच्या एपिसोडला दर्शकांची खास पसंती मिळाली होती. त्यामुळे आता रजनीकांत यांच्या एपिसोडबद्दलही रसिकांच्या मनात विशेष उत्सुकता आहे. दरम्यान बंदिपूरचे जंगल हे व्याघ्र प्रकल्पासाठी राखीव आहे.