Mahesh Kale Birthday Special: शास्त्रीय संगीतातील एक अग्रगण्य नाव महेश काळे. तो हिंदुस्थानी आणि भक्तीसंगीतामध्येही माहिर आहे. अमेरिकेत राहून देखील भारतीय शास्त्रीय संगीताशी एक अतूट नाळ जोडून ठेवणाऱ्या या गायकाचा आज वाढदिवस आहे. महेशने आजवर त्याच्या आवाजातील अनेक गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ तर पडलीच पण कट्यार काळजात घुसली या चित्रपटही त्याच्या गायकीने तर प्रेक्षकांचे मन जिंकले. तो सूर नवा ध्यास नवा या रिऍलिटी शोमधून टेलिव्हिजन माध्यमावर प्रेक्षकांच्या भूमिकेत दिसतो. तर आजच्या या खास दिवशी आपण जाणून घेणार आहोत महेशबद्दल काही स्पेशल सिक्रेट्स आणि पाहणार आहोत त्याची काही हिट गाणी.
वयाच्या सातव्या वर्षांपासून महेश काळेने शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्याने इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. पण तिथेही त्याने संगीताची साथ सोडली नाही. तिथेही तो संगीताचे धडे गिरवत होता. त्याने संगीत विषयात एम. एस. पदवी मिळवली आहे, आता तो कॅलिफोर्नियामधील सनीवेल इथे गायनाचे क्लासेस घेतो.
पाहूया महेशच्या आवाजातील काही हिट गाणी,
अचानक राहुल देशपांडे याने महेशला कट्यार काळजात घुसली या चित्रपटासाठी कॉन्टॅक्ट केले. आणि महेशच्या आवाजातील गाणी आजही मोठ्यांसोबतच तरुणांमध्येही गाजत आहेत. महेशला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पूरसाकाराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचसोबत, हरिहरन, विक्कू विनायकराम, झाकीर हुसेन अशा दिग्गनसोबत त्याने अनेक मैफली गाजवल्या आहेत.