Lata Mangeshkar यांच्या अस्थींचे कुटुंबीयांनी नाशिकच्या रामकुंडात केले विसर्जन, पाहा व्हिडीओ
लता मंगेशकर (Photo Credits: Facebook)

दिवंगत गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अस्थींचे विसर्जन केले. आज सकाळी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पवित्र रामकुंडात त्यांच्या अस्थिचे विसर्जन करण्यात आले. त्यांचे पुतणे आदिनाथ मंगेशकर, बहीण आशा भोसले आणि इतर नातेवाईक या धार्मिक विधीसाठी उपस्थित होते. अस्थी विसर्जनापूर्वी हिंदू धर्मगुरूंनी कुटुंबासह आणि काही जवळच्या लोकांसोबत एक छोटासा प्रार्थना समारंभ आयोजित केला होता.असे म्हटले जाते की भगवान राम जिथे  14 वर्षांच्या वनवासात दररोज स्नान करत असत अशा पवित्र रामकुंडात अस्थि विसर्जित करण्यात आली. 6 फेब्रुवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले होते. दीदींच्या अंत्यदर्शनाला त्या दिवशी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विविध केंद्रीय आणि राज्यांचे कॅबिनेट मंत्री, बॉलीवूड सेलेब्स आणि इतरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर पूर्ण सरकारी सन्मानाने सार्वजनिक अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, आदिनाथ मंगेशकर यांनी 'अस्थी' गोळा केल्या आणि शेवटी आज पवित्र रामकुंडात अस्थींचे विसर्जन केले. भूतकाळात जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, वाय.बी. चव्हाण आणि इतर अनेक नेत्यांच्या अस्थिकलशाचे याच पवित्र स्थळी विसर्जन करण्यात आले होते.