लता मंगेशकर (Photo Credits-Twitter)

Lata Mangeshkar 90'th Birthday Special: भारताची गानकोकीळा म्हणून ओळख असणाऱ्या गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आज (28 सप्टेंबर) 90 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. लता मंगेशकर यांच्या सुमधूर आवाजाने मन्न अगदी प्रसन्न होते. परंतु जगविख्यात गायिका होण्यापर्यंतचा लतादीदींचा प्रवास फारच खडतर होता. तसेच लतादीदींनी गायिका होण्यापर्यंतच्या प्रवासासोबत अन्य क्षेत्रासुद्धा काम केले आहे. वयाच्या 5 व्या वर्षापासून त्यांनी वडीलांच्या संगीत नाटकात अभिनय करायला सुरुवात केली. त्याचबरोबर 1945 साली आलेल्या मास्टर विनायक यांच्या पहिल्या सिनेमात 'बडी माँ' या हिंदी सिनेमातही त्यांनी लहानशी भूमिका साकारली होती.

लता मंगेशकर यांची गाणी आजवर जरी ऐकली तरीही अंगावर शहारे येतात. तर 1942 साली आलेल्या 'किती हसाल' सिनेमात त्यांनी पहिले गाणे गायले. गाण्याचे बोल होते- 'नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी.' पण शेवटी ते गाणे सिनेमातून कट करण्यात आले. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी 'पहिली मंगळागौर' सिनेमात 'नटली चैत्राची नवलाई' हे गाणे गायले आणि ते त्यांच्या करिअरमधील पहिले गाणे ठरले.

>>मालवून टाक दीप:

>>ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे:

>>गगन सदन तेजोमय:

>>चाफा बोलेना चाफा चालेना:

>>बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला:

>>माय भवानी तुझे लेकरू:

>>मेंदीच्या पानावर:

>>रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा:

>>शुभंकरोती म्हणा मुलांनो:

>>वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे:

(नरेंद्र मोदी यांच्या 'सौगंध मुझे इस मिट्टी की ...' कवितेला लता मंगेशकर यांचा स्वरसाज; भारतीय जवान आणि जनेतला गाणं समर्पित Watch Video)

लतादीदींनी 1955 साली आलेल्या 'राम राम पाव्हन' या मराठी सिनेमासाठी पहिल्यांदा संगीतकार म्हणून काम पाहिले होते. त्याचबरोबर लतादीदी निर्मात्याही झाल्या. त्यांनी मराठी, हिंदीत अशा 4 सिनेमांची निर्मिती केली. तर मेकअप, ग्लॅमरपासून दूर राहणाऱ्या लतादीदींना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच लतादीदींनी आतापर्यंत 14 वेगवेगळ्या भाषांमध्ये साधारणपणे 50000 गाणी गायली आहेत.