Lakme Fashion Week 2019: अन् रॅम्पवॉक करताना यामी गौतम पडता पडता वाचली (Video)
Yami Gautam (Photo Credits: Yogen Shah and Instagram)

मंगळवारी मुंबईत रंगलेल्या लॅक्मे फॅशन वीक 2019 (Lakme Fashion Week 2019) मध्ये अनेक बॉलिवूड स्टार्संनी रॅम्पवॉकवर आपला जलवा दाखवला. पहिल्या दिवशी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आणि अभिनेत्री तब्बू (Tabu) यांनी रॅम्पवॉक केला. तर दुसऱ्या यामी गौतम (Yami Gautam) रॅम्पवॉक (Ramp Walk) करताना दिसली. यामी गौतमचा रॅम्पवॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण म्हणजे रॅम्पवॉक करताना यामी गौतम पडता पडता वाचली. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगात मात्र यामीने अगदी खुबीने स्वतःला सावरले आणि पुन्हा हसत हसत पुन्हा रॅम्पवॉक करु लागली. (मुंबई पोलिसांच्या 'उमंग 2019' मध्ये यामी गौतम हिचा जबरदस्त परफॉर्मन्स)

यामी गौतमचा व्हिडिओ आणि फोटोज:

अलिकडेच यामी गौतमचा 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर सिनेमाने 150 कोटींची बक्कळ कमाई केली आहे. त्याचबरोबर अनेक दिग्गजांनी या सिनेमाचे भरभरुन कौतुक केले आहे.