Koffee With Karan 7 Promo Video: करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये Alia Bhatt ने तिच्या पहिल्या रात्रीबद्दल केला खुलासा, सांगितले गुपित, पाहा काय म्हणाली आलिया
Kofee With Karan-7

Koffee With Karan 7 Promo Video: करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोचा नवा सीझन ७ जुलैपासून सुरू होत आहे. शोचा नवा प्रोमो नुकताच  रिलीज करण्यात आला आहे, नवीन प्रोमो मध्ये करण जोहरसोबत रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसत आहेत. आलिया आणि रणवीर या शोचे पहिले पाहुणे असणार आहेत. करणने आलिया आणि रणवीरची ओळख एक विवाहित जोडपे म्हणून करून दिली, परंतु त्यांनी एकमेकांशी लग्न केले नसल्याचा उल्लेखही केला आहे. दरम्यान तिघांचीही मस्ती सुरू होते. करण आलियाशी लग्नासंबंधी प्रश्न विचारतो. दरम्यान, आलिया म्हणते सुहागरात वैगरे असे काही नसते, त्या रात्री तुम्ही  थकलेले असतात. करण जोहरने आलियाला पुढे विचारले की, तिची वरुण किंवा रणवीरमध्ये कोणासोबत उत्तम केमिस्ट्री आहे का? यावर आलिया काही काळ गप्प बसते. रणवीरला याचे वाईट वाटते, कारण तिने अशी प्रतिक्रिया दिली. 'तो  शो सोडण्याची धमकी देताना दिसतो. हा एपिसोड मजेदार असणार आहे असे दिसत आहे. [हे देखील वाचा:- Esha Gupta ने Bikini मधले व्हिडीओ पोस्ट करून सोशल मिडीयावर लावली आग, ईशाची मादक अदा पाहून चाहते हैराण, पाहा sexy व्हिडीओ]

 

 

Koffee With Karan 7 चा पहिला भाग 7 जुलै रोजी Disney Plus Hotstar वर संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होईल. या शोमध्ये करण जोहर आलिया आणि रणवीर सिंग यांच्याशी वैयक्तिक संवाद साधताना दिसणार आहे. जे तुम्ही यापूर्वी क्वचितच ऐकले असेल.