'पारू गो पारू, वेसावची पारू' ते 'डोल डोलतंय वाऱ्यावर' या गाण्यांवर देशा-परदेशातील लोकांना ठेका धरायला लावणारे गीतकार, शाहीर काशिराम चिंचय (Kashiram Chinchay) यांचे निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते. मागील काही दिवस आजारी असलेल्या काशिराम चिंचय यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्यांची आज (14 जानेवारी) पहाटे प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुलं व त्यांचे कुटुंब असा परिवार आहे.
आगरी पारंपारिक गाण्यांवर मागील 5 दशकं लोकांना त्यांनी ठेका धरायला लावला आहे. कोळीगीतांना साता समुद्रापार नेण्यामध्ये विजय कठीण आणि काशीराम चिंचय यांचा मोलाचा वाटा होता. ते एकत्र काम करत होते. त्यांच्या सर्व कॅसेट “वेसावकर आणि मंडळी” या नावाने व्हीनस कंपनीने प्रसिद्ध केल्या होत्या. या वेसावकर मंडळीने मानाची प्लॅटिनम डिस्कही मिळवली होती. नक्की वाचा: Rekha Kamat Passes Away: अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड; 89 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन.
डोल डोलतंय वाऱ्यावर माझी, डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला, वेसावची पारू, हिच काय गो गोरी गोरी पोरी ही त्यांची गाणी विशेष गाजली.