अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा भाऊ आणि 'कहानी घर घर की' (Kahani Ghar Ghar Ki) या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता सचिन कुमार (Sachin Kumar) याचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सचिन हा अक्षय कुमार याच्या आत्याचा मुलगा होता. वयाच्या 42व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील अंधेरी (Andheri) मध्ये त्यांच्या राहत्या घरी त्याला हार्टअटॅक आल्याचे समजत आहे . सचिनच्या निधनानंतर टीव्ही इंडस्ट्री मधील अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. सचिनने काही वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो फोटोग्राफर म्हणून काम करत होता, टीव्ही आणि बॉलिवूड मधील अनेक कलाकारांचे फोटोशूट त्याने केले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार सचिन हा गुरुवारी रात्री झोपायला गेला आणि दुसऱ्या दिवशी दारच उघडले नाही. तो आपल्या पालकांसोबत राहत होता, सकाळी त्याने दार न उघडल्याने पालक घाबरून गेले होते. शेवटी त्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला आणि आत गेल्यावर तिथे सचिन मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले.
सचिन कुमार याने एकता कपूर च्या 'कहानी घर घर की' या मालिकेत काम केले होते, ही सीरियल गाजली असताना सचिनला सुद्धा बरीच प्रसिद्ध लाभली होती. त्यानंतर 'लज्जा' या मालिकेत देखील काम केले होते, यामध्ये त्याने निगेटिव्ह रोल साकारला होता.