जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर पहील्यांदाच सोबत करणार रुपेरी पडद्यावर काम; पाहा Housefull 4 मधली त्यांची पहिली झलक
Johnny and Jamie Lever | (Image Courtesy: Instagram)

 

आजवर बॉलीवूड मध्ये अनेक बापलेकांच्या आणि मायलेकांच्या जोड्या रुपेरी पडद्यावर झळकल्या आहेत. राज कपूर- ऋषी कपूर, अमिताभ बच्चन- अभिषेक बच्चन सारख्या अनेक जोड्या तर हिट सुद्धा झाल्या आहेत. आता ह्याचच जोड्यांमध्ये अजून एका जोडीची भर पडते आहे. ही जोडी दुसरी तिसरी कोणीही नसून सर्वांचा लाडका विनोदवीर जॉनी लिव्हर आणि त्याची मुलगी जेमी लिव्हर यांची असणार आहे. हाऊसफुल 4 या चित्रपटात हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

अक्षय कुमारने (Akshay Kumar) सोशल मीडियावर नुकताच या दोघांच्या पात्रांचा पहिला लुक शेयर केला आहे. अक्षय म्हणतो,"भेटा विन्स्टन चर्चगेट आणि 'गिगली'ला. एक आहे सन 1419 ची तर दुसरा आहे सन 2019 चा."

 

चित्रपटात जॉनी लिव्हर जेमी लिव्हरच्या पुनर्जन्मातलं पात्र साकारणार आहे. जेमी लिव्हरने या आधी किस किसको प्यार करू या चित्रपटामधून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं होतं. ती सुद्धा वडिलांप्रमाणेच विनोदवीर देखील आहे. या आधी तिने कॉमेडी सर्कस मध्ये भाग घेतला होता. हाऊसफुल 4 हा चित्रपट 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होतो आहे.