दाक्षिणात्य सुपरस्टार विजय (South Superstar Vijay) त्याच्या चित्रपटांइतकाच त्याच्या दिलदार स्वभावामुळे बराच चर्चेत असतो. मागील वर्षी त्याने आपल्या आगामी चित्रपट 'बिगिल' (Bigil) चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सेटवर सिनेमाच्या टीमला 400 सोन्याच्या अंगठ्या वाटल्या होत्या. त्याचे हे सरप्राईज सर्वांनाच धक्कादायक आणि अनपेक्षित असे होते. मात्र त्याचे हे सरप्राईज आणि त्याला या सिनेमासाठी मिळालेले मानधन बरेच चर्चेत होते. त्याच धर्तीवर या सुपरस्टारच्या घरावर आयकर विभागाची छापे पडले आहेत. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, विजयच्या घरावर आयकराची धाड पडली त्यावेळी विजय तामिळनाडूतील नेयवली कोलसा खाणीत त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत होता. मात्र या छापेमारीमुळे विजयला शूटिंग अर्धवट सोडून घरी परतावं लागलं.
एजीएस एंटरप्रायजेस या कंपनीवरील छापेमारीदरम्यान, सुपरस्टार विजयला 'बिगिल' या सिनेमासाठी दिलेल्या पैशांवरुन गडबड झाल्याचं आढळलं. त्याबाबत आयकर विभागाने अधिक चौकशी केली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विजयला या सिनेमासाठी मोठी रक्कम मिळाल्याची माहिती आधीच आयकर विभागाला लागली होती. त्यानुसार, त्यांच्या त्या दिशेने तपास सुरु होता.
ANI चे ट्विट:
Sources: Money recovered from the financer of Tamil actor Vijay during Income Tax Department raids. https://t.co/IBIl5mouYl pic.twitter.com/tbOIX76X3I
— ANI (@ANI) February 6, 2020
याच्या आधारावर त्यांनी विजयच्या फायनान्सरच्या घरातून पैशाच्या बॅगा जप्त केल्या. त्याच धर्तीवर आयकर विभागाने 5 फेब्रुवारीला विजयच्या शालीग्राम आणि पनैयूर इथल्या घरांवर धाडी टाकल्या. त्या धाडी आज पुन्हा सुरु केल्या.
विजयच्या घरी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी छापेमारी केल्याची बातमी जसी पसरली, तसं सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्याच्या चाहत्यांसाठी ही बातमी धक्कादायक होती. आपल्या सुपरस्टार च्या बाजूने उभे राहण्यासाठी #WestandwithVijay हा हॅशटॅग ट्रेंड झाला. विजय करचोरी करु शकत नाही, असा दावा त्याचे फॅन्स करत आहेत.