श्रीदेवीसोबत काम केलेल्या साउथच्या अभिनेत्याने सिनेमाच्या सेटवरील लोकांना वाटल्या 400 सोन्याच्या अंगठ्या
Vijay Thalapathy (Photo Credits: Instagram)

सिनेमा, त्या मागची मेहनत आणि शूटिंगचा शेवटचा दिवस हा प्रत्येक कलाकाराला आणि सेटवरील लोकांसाठी आनंदाचा तसेच भावूक देखील असतो. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या खूप आठवणी जोडलेल्या असतात. त्या चित्रपटाच्या शूटिंगची सर्वांना आठवण राहावी म्हणून साउथमधील सुप्रसिद्ध अभिनेता विजय थलापति (Vijay Thalapathy) याने त्याच्या आगामी चित्रपट 'बिगिल' (Bigil) च्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सेटवर सिनेमाच्या टीमला 400 सोन्याच्या अंगठ्या वाटल्या. त्याचे हे सरप्राईज सर्वांनाच धक्कादायक आणि अनपेक्षित असे होते.

या अंगठ्या देताना 'बिगिल' चित्रपटातील कलाकार आणि विशेष करून क्रू मेंबर्स खूपच भावूक झाले होते. त्यांनी हे फोटो ताबडतोब सोशल अकाउंटवर शेअर करुन विजयचे आभार मानले.

 

View this post on Instagram

 

Shoot completed for #BIGIL

A post shared by Vijay Official Fan Page (@vijay_official) on

 

View this post on Instagram

 

Thalapathy ku BIGIL podu🔥 Thank you so much sir for this Unforgettable Gift! Loved it❤ #heartofgold #bigil #thalapathy

A post shared by Aadhirai🐾A Rare Bird (@aadhirai_soundararajan) on

 

View this post on Instagram

 

When Thalapathy Vijay gives you the BEST GIFT EVERRRRRR!!!!! ❤️❤️❤️ #bigil

A post shared by Varsha Bollamma (@varshabollamma) on

विजयनं या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्याच्या आनंदात 400 लोकांच्या टीमला ही खास भेटवस्तू दिली. विजयनं संपूर्ण टीमला 400 सोन्याच्या अंगठ्या भेट म्हणून दिल्या. या अंगठ्यांवर सिनेमाचं नावंही लिहिलेलं आहे. आम्हाला आयुष्यभरासाठी कायम आठवणीत राहिल अशी भेट दिल्याबद्दल धन्यवाद, असे म्हणत अनेकांनी विजयचे आभार मानले.

हेही वाचा- पाहा 'तुला पाहते रे' मालिकेची फेअरवेल पार्टीमधील धमाल, मस्ती, झिंगाट डान्स आणि बरेच काही

अभिनेता विजय थालापथि याची प्रमुख भूमिका असलेला ‘बिगिल’हा सिनेमा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. हा एक अ‍ॅक्शन आणि थ्रिलर ड्रामा असून यात विजय सोबत साउथ अभिनेत्री नयनतारा दिसणार आहे. तर बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ सुद्धा या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 27 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. याआधी श्रीदेवीसोबत 'पुली' या चित्रपटात एकत्र काम केले होते.