प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook/JTrickeyphotography)

अमेरिकेतील ज्यांना हॉरर चित्रपट (Horror Movies) पाहण्याची आवड असेल त्यांच्यासाठी मोठी रक्कम जिंकण्याची संधी आहे. अशा लोकांना एक अमेरिकन कंपनी ऑक्टोबरमध्ये 1300 अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळजवळ 95,000 रुपये देईल, ज्यासाठी त्या व्यक्तीला फक्त 13 हॉरर चित्रपट पहावे लागतील. हे चित्रपट पाहिल्यानंतर त्याबाबतची प्रतिक्रिया नोंदवावी लागेल. फायनान्सबझ (FinanceBuzz) कंपनी 'हॉरर मूव्ही हार्ट रेट अॅनालिस्ट' या पदासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करत आहे. या व्यक्तीचे काम 13 सर्वात भयानक चित्रपट पाहणे असेल. कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके फिटबिटसह रेकॉर्ड केले जातील.

सीएनएनच्या अहवालानुसार, या कामाद्वारे प्रत्यक्षात चित्रपटाच्या बजेटचा प्रेक्षकांवर विशेष प्रभाव पडतो की नाही हे शोधायचे आहे. कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे, ‘आगामी हॉरर चित्रपट सीझनसाठी, आम्ही फायनान्सबझ येथे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत की, बिग बजेट हॉरर चित्रपट कमी बजेटच्या सिनेमांपेक्षा जास्त भीतीदायक आहेत का.’ 13 चित्रपटांड वारे हे शोधले जाईल की, एखाद्या चित्रपटाचे बजेट प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवते की नाही. यासाठी फिटबिटद्वारे हृदयाचे ठोके रेकॉर्ड केले जातील.

या कामासाठी निवडलेल्या व्यक्तीला पुढील चित्रपट पहावे लागतील -

कशी असेल प्रक्रिया-

26 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत लोक कंपनीच्या वेबसाइटवर अर्ज करू शकतात. निवडलेल्या उमेदवारांची निवड 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत केली जाईल आणि ईमेलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. हे अर्जदार 18 पेक्षा जास्त वयाचे आणि युनायटेड स्टेट्समध्ये राहणारे असावेत. निवडलेल्या उमेदवारांना त्यांचे फिटबिट 4 ऑक्टोबर 2021 पर्यंत पाठवले जाईल. यानंतर, उमेदवाराला चित्रपट पाहण्यासाठी आणि असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी 9 ऑक्टोबर 2021 ते 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत वेळ असेल.