Spiderman निर्माता हरपला, स्टेन ली यांचे निधन
स्टेन ली (फोटो सौजन्य- ट्विटर)

मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक स्टेन ली यांचे सोमवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास प्राणज्योत मालवली. स्टेन ली हे 95 वर्षांचे असून लॉस एंजल्स येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्पायडर मॅन, आयरन मॅन, ब्लॅक पँथर यासारखे पात्र रेखाटणारे स्टेन ली हे कॉमिक्स लेखकासोबत संपादक, चित्रपट निर्माते, अभिनेता आणि प्रकाशक होते. तसेच 1961 मध्ये त्यांनी 'द फॅन्टास्टिक फोर' हे सुपरहिरो उभे केले. त्यानंतर वाचकांकडून या सुपरहिरोंसाठी भरपूर प्रतिसाद मिळाला. तसेच 'चक्र' या अॅनिमेशन पट असून तो कार्टून नेटवर्क, ग्राफिक इंडिया तर पाओ इंटरनॅशनल यांच्या संयुक्तपणे तो बनविण्यात आला होता.

ली यांच्या निधनाने हॉलिवूडमध्ये शोककळा परसरली आहे. तर ली यांची तब्येत फारत बिघडल्याने त्यांना सीडर्स मेडिकल सेंटर येथे ठेवण्यात आले होते.तसेच 'चक्र' या अॅनिमेशन सिनेमाच्या दरम्यान ते भारतातही आले होते. तर भारतात चित्रपट निर्माते म्हणूनही त्यांनी काम केले आहे.