Sexual Harassment केल्याचा Singer Lizzo वर आरोप, खटला दाखल
Singer Lizzo (Photo Credits: Twitter)

जगप्रसिद्ध गायीका लिझो (Singer Lizzo) हिच्यावर लैंगिक छळ (Sexual Harassment) आणि मानहानी प्रकरणी खटला दाखल झाला आहे. तिच्या ताफ्यात काम करणाऱ्या तीन नर्तकांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्याचा आणि लज्जास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप केल्यानंतर हे कायदेशीर पाऊल उचलण्यात आले. एका नर्तिकेने दावा केला आहे की, फेब्रुवारीच्या उत्तरार्धात अॅमस्टरडॅम क्लबमध्ये एका नग्न कलाकाराला स्पर्श करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला होता.

निर्मिती कंपनी बिग ग्र्रल बिग टूरिंग इंक आणि तिच्या नृत्य समूहाची प्रमुख, शर्लिन क्विग्लीव बाबत न्यायालयाच्या कागदपत्रांवरून दिसून आले की, लॉस एंजेलिस काउंटी सुपीरियर कोर्टातील खटला लिझो नावाच्या गायिकेविरुद्ध दाखल करण्यात आला. जिचे खरे नाव मेलिसा व्हिव्हियान जेफरसन आहे. रॉयटर्स नामक वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Sex With 200 People: '200 लोकांसोबत ठेवले शारीरिक संबंध'; American Pie ची अभिनेत्री Jennifer Coolidge चा धक्कादायक खुलासा)

फिर्यादी एरियाना डेव्हिस, क्रिस्टल विल्यम्स आणि नोएल रॉड्रिग्ज यांनी दाखल केलेल्या तक्रारींमध्ये लिंग, धर्म, वंश आणि अपंगत्वावर आधारित छळाचा समावेश आहे. तक्रारीमध्ये असेही म्हटले आहे की डेव्हिसला तिला अस्वस्थता असूनही नृत्य स्पर्धेत राहण्यासाठी न्यूड फोटोशूटमध्ये भाग घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. तिने दावा केला की तिने 35 वर्षीय गायकाच्या विनंतीकडे कोणत्याही प्रकारे लक्ष देण्यात आले नाही. आता तर तिला नोकरी गमावण्याची भीती आहे.

याचिकाकर्त्यांचे वकील, रॉन झांब्रानो यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, लिझो आणि तिच्या मॅनेजमेंट टीमने त्यांच्या कलाकारांशी कसे वागले याचे आश्चर्यकारक स्वरूप लिझो सार्वजनिकपणे मांडत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधात असल्याचे दिसते, तर खाजगीरित्या ती तिच्या नर्तकांना लाजवेल आणि त्यांना अशा प्रकारे अपमानित करते जे केवळ बेकायदेशीरच नाही तर पूर्णपणे निराशाजनक आहे.