अमेरिकेतील (America) लॉस एंजेलिसमध्ये गायक जस्टिन बीबरच्या (Singer Justin Bieber) कॉन्सर्टनंतर एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या पार्टीबाहेर गोळीबारात चार जण जखमी झाले आहेत. लॉस एंजेलिस पोलिस विभागाचे अधिकारी लिझेथ लोमेली यांनी सांगितले की, द नाइस गाय रेस्टॉरंटच्या बाहेर झालेल्या गोळीबारात (Firing in US) चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी शनिवारी दुपारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना तेथे दोन बळी सापडले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, इतर दोन पीडित स्वत: रुग्णालयात पोहोचले. चारही जखमींची प्रकृती स्थिर आहे. सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये रॅपर कोडॅक ब्लॅक उर्फ बिल कॅप्री रेस्टॉरंटच्या बाहेर गोळीबार सुरू असताना लोकांच्या गटासोबत पोज देताना दिसत आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सूत्रांनी एनबीसी न्यूजला सांगितले की, या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये ब्लॅकचा समावेश आहे. जेफ बेझोस, त्याची मैत्रीण लॉरेन सांचेझ, अभिनेते अँथनी रामोस आणि टोनी गोन्झालेझ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींचा समावेश होता.
पार्टीनंतर अनेक सेलिब्रिटी दिसले
हॉलिवूड रिपोर्टरने वृत्त दिले की बीबर आणि त्याची पत्नी हेली बाल्डविन, ड्रेक, ख्लो कार्दशियन आणि टोबे मॅग्वायर यांच्यासह मनोरंजन जगतातील अनेक सेलिब्रिटी पार्टीनंतर रेस्टॉरंटला भेट देताना दिसले. 19, 24 आणि 60 वर्षे वयोगटातील तिघांची ओळख पटली आहे. दुपारी 2.45 वाजता अचानक हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हल्ल्यात 24 वर्षीय कोडक ब्लॅक जखमी झाला आहे. अनेक राऊंड गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस विभागाने तिसर्या व्यक्तीला घटनास्थळापासून दूर नेले आणि रुग्णालयात नेले. (हे ही वाचा Suicide: ऑस्कर विजेत्या दिग्दर्शिका रेजिना किंगच्या मुलाची गळफास लावून आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट)
संशयितांबाबत काहीही माहिती नाही
सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमागे लपलेल्या संशयितांबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नसून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. काल रात्री झालेल्या कार्यक्रमांमध्ये बीबरने अर्धा तास परफॉर्म केला. यावेळी सुमारे 1500 लोक उपस्थित होते. मध्यरात्री हा कार्यक्रम संपला.