Sexiest Man Alive 2021: लोकप्रिय हॉलीवूड अभिनेता Paul Rudd ठरला यंदाचा जगातील सर्वात 'सेक्सी पुरुष'; Marvel च्या अनेक चित्रपटांमध्ये साकारली आहे भूमिका 
Actor Paul Rudd is People's Sexiest Man Alive 2021 (Photo Credits: Twitter)

मार्वलचे जगप्रसिद्ध चित्रपट 'अँट-मॅन', 'दिस इज 40' आणि 'क्लूलेस' मधील सशक्त भूमिकांसाठी लोकप्रिय असलेला प्रसिद्ध हॉलिवूड स्टार पॉल रुड (Paul Rudd) याला पीपल (People) मासिकाने 'सेक्सिएस्ट मॅन अलाइव्ह 2021' (Sexiest Man Alive 2021)  म्हणून घोषित केले आहे. People.com च्या वृत्तानुसार टीव्ही सेलेब स्टीफन कोल्बर्ट यांनी 'द लेट शो विथ स्टीफन कोल्बर्ट' च्या एका एपिसोडमध्ये याबाबत माहिती दिली. अमेरिकेतील प्रसिद्ध सेलिब्रिटी मासिक पीपल दरवर्षी एका जिवंत व्यक्तीला जगातील सर्वात सेक्सी पुरुषाची पदवी देते. विजेत्याची घोषणा दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात केली जाते. यावेळी हॉलिवूडचा सुपरहिरो अँटमॅनची भूमिका साकारणारा अमेरिकन अभिनेता पॉल रुड याने हे विजेतेपद पटकावले आहे.

पीपल मॅगझीन सेक्सिएस्ट मॅन अलाइव्ह 2021 बनल्यानंतर, अभिनेत्याने आश्चर्य व्यक्त केले आणि सांगितले की मला हा सन्मान मिळाल्यामुळे इतरही बरेच लोक आश्चर्यचकित होतील. तो असेही म्हणाला की आपण हे जेतेपद नाकारत नाही पण असे अनेक लोक आहेत ज्यांचा खऱ्या अर्थाने यावर हक्क आहे.

52 वर्षीय अभिनेता पॉल रुड 1991 पासून अभिनय करत आहे. आतापर्यंत त्याने  दोन डझनपेक्षा जास्त हॉलीवूड चित्रपट आणि त्याहीपेक्षा जास्त टीव्ही शोज केले आहेत. पॉल क्लूलेस, रोमियो प्लस ज्युलिएट, अँटमॅन सीरीज आणि अ‍ॅव्हेंजर्स सिरीज या चित्रपटांसह अनेक संस्मरणीय चित्रपटांसाठी ओळखला जातो. दोन मुलांचा वडील असलेल्या पॉल रुड यांचा 2019 साली फोर्ब्सच्या 100 सर्वात प्रसिद्ध आणि महागड्या 100 सेलिब्रिटींच्या यादीत समावेश करण्यात आला होता. (हेही वाचा: House of The Dragon Teaser: लवकरच येणार Game of Thrones चा प्रीक्वल, दिसणार 200 वर्षांपूर्वीची कथा; समोर आला 'हाऊस ऑफ द ड्रॅगन'चा भव्य टीजर)

लोकप्रिय अमेरिकन सिटकॉम 'फ्रेंड्स' मध्ये त्याने फिबीचा प्रियकर आणि नवऱ्याची भूमिका साकारली होती. या शोमुळेही त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘घोस्टबस्टर्स आफ्टरलाइफ’ मध्ये दिसणार आहे. तसेच Apple TV+ मालिका ‘द श्रिंक नेक्स्ट डोर’ मध्ये विल फेरेलसोबत दिसणार आहे, ज्याचा 12 नोव्हेंबरला प्रीमियर होईल. पीपल मॅगझिनने यावेळी त्यांच्या आवृत्तीच्या कव्हर पेजवर पॉलला स्थान दिले आहे. दरम्यान, पीपल मॅगझिनने 2020 मध्ये प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मायकेल बी जॉर्डनला सर्वात सेक्सी माणूस म्हणून घोषित केले होते.