House of the Dragon Teaser (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेम ऑफ थ्रोन्स (Game of Thrones) हा जगातील सर्वात हिट शोपैकी एक मानला जातो. कित्येक वर्षे या शोने जगभरातील तमाम चाहत्यांना वेड लावले होते. भारतामधूनही या शोला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. अशा परिस्थितीत गेम ऑफ थ्रोन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा प्रीक्वल येऊ घातला आहे. प्रीक्वलचे नाव ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ (House of the Dragon) असे असून, सध्या त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतेच एबीओने (HBO) हाऊस ऑफ द ड्रॅगनचा टीजर प्रदर्शित केला आहे.

गेम ऑफ थ्रोन्सचा 8 वा सीझन संपल्यापासूनच चाहते नवीन सिझन किंवा प्रीक्वलची मागणी करत होते. आता निर्मात्यांनी अशा चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. हाऊस ऑफ द ड्रॅगन 2022 मध्ये रिलीज होणार आहे. परंतु आता बहुप्रतीक्षेनंतर निर्मात्यांनी रिलीजबाबत अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. प्रीक्वलचा हा टीझर खूपच रंजक असून तो आर. आर. मार्टिनची कादंबरी फायर अँड ब्लडवर आधारीत आहे.

हाऊस ऑफ द ड्रॅगन टीजर-

ही कादंबरी 2018 मध्ये लिहिली गेली होती. या सिरीजमध्ये गेम ऑफ थ्रोन्सच्या पूर्वी 200 वर्षांपूर्वी कथा दाखवली जाणार आहे. यात गेम ऑफ थ्रोन्सच्या सीझनप्रमाणे 10 एपिसोड असतील. गेम ऑफ थ्रोन्स हा शो त्याच्या भव्यतेसाठी ओळखला गेला होता. अगदी तशीच भव्यता हाऊस ऑफ द ड्रॅगनमध्ये दिसून येत आहे. यामध्ये ही राजगादीची राज मुकुटासाठीचे युध्द पहायला मिळणार आहे.

(हेही वाचा: इतिहासात पहिल्यांदाच! अंतराळात होणार Russian चित्रपटाचे शुटींग; आज अभिनेत्री, दिग्दर्शकासह संपूर्ण टीम होणार रवाना)

यामध्ये Emma D’Arcy, Matt Smith, Steve Toussaint, Olivia Cooke, Rhys Ifans असे कलाकार दिसणार आहे. मागच्यावर्षी मेपासून या प्रीक्वलची तयारी सुरु झाली आहे. या सिरीजचे संपूर्ण चित्रीकरण इंग्लंडमध्ये होत आहे.