Sarita Choudhury, Nicole Ari Parker, Karen Pittman | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सेक्स अँड द सीटी (Sex and the City) या अमेरिकी विनोदी टीव्ही मालिकेचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या वेळी या मालीकेचा पुढचा भाग अँड जस्ट लाईक ( And Just Like) नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. मीडिया रिपोर्टनुसार सारा जेसिका पार्कर (Sarah Jessica Parker), सिन्थिया निक्सन (Cynthia Nixon ) आणि क्रिस्टिन डेव्हिस (Kristin Davis) यांच्यासोबत ​या मालिकेच्या चित्रिकरणाची सुरुवात न्यूयॉर्कमध्य सुरु देखील झाले आहे. या वेळी निकोल अॅरी पार्कर (Nicole Ari Parker), सरिता चौधरी (Sarita Choudhury), कॅरेन पिटमन ( Karen Pittman) यांचा या सिक्वेलध्ये समावेश असणार आहे. या नव्या त्रिकूटाची केमेस्टी प्रेक्षकांना कशी वाटते याबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या पूर्वीही चर्चा होती की, ख्रिस नॉथ (Chris Noth) ही पुन्हा एकदा या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारेन. तसेच, निकोल अ‍ॅरी पार्कर, सरिता चौधरी आणि कॅरेन पिटमन हीमंडळीही या नव्या पर्वात महत्वाची भूमिका साकारताना दिसतील. सेक्स इन द सिटी ही एक अमेरिकी विनोदी टीव्ही मालिका आहे. याचे दिग्दर्शन डेरेन स्टार यांनी केले आहे. तर एचबीओने निर्मीती केली आहे. या मालिकेचे पहिल्यांदा प्रसारण 1998 ते 2004 या कालावधीत झाले. या काळात या मालिकेचे साधारण 94 भाग प्रसिद्ध झाले. (हेही वाचा, 'मी कधीच Bra घालणार नाही, माझे स्तन बेंबीपर्यंत पोहोचले तरी चालतील'; लोकप्रिय अभिनेत्रीने मांडले आपले विचार (Watch Video))

दरम्यान, ही मालिका कँडेस बुशनेल यांच्या एका पुस्तकावर आधारीत आहे. हे पुस्तक याच नावाने 1997 मध्ये प्रसिद्ध झाले होते. खरे तर हे पुस्तक न्यू यॉर्क ऑब्जर्वर मध्ये छापून आलेल्या लेखांचा संग्रह होता. सुरुवातीला या लेखकाने आपल्या नावाने लिखान सुरु केले. परंतू पुढे सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणावरुन त्याने एक पात्र जन्माला घातले.