पामेला एंडरसन पाचव्यांदा बोहल्यावर, वयाच्या 52 व्या वर्षी 72 वर्षीय व्यक्तीसोबत केले लग्न
Pamela Anderson, Jon Peters | (Photo credit: archived, edited, symbolic images)

हॉलीवुड अभिनेत्री पामेला एंडरसन (Pamela Anderson) पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढली आहे. वयाच्या 52 व्या वर्षी तब्बल 72 वर्षीय व्यक्तीसोबत ती विवाहबद्ध झाली. त्यामुळे पामेला पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांतून चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे पामेला एंडरसन हिचा हा पाचवा विवाह आहे. हॉलीवुड प्रोड्यूसर जॉन पीटर्स (Jon Peters यांच्यासोबत पामेला आपल्या आयुष्यातील पाचवा विवाह आहे. सांगितले जात आहे की, केल्या प्रदीर्घ काळापासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'पामेला एंडरसन आणि जॉन पीटर्स या दोघांनी एका खासगी सेरेमनीदरम्यान विवाह आटोपला आहे. दोघेही एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात. दोघांच्या वयाबाबत सांगायचे तर पामेला आता पन्नाशीत आहे तर, तिचा पती जॉन पीटर्स हा सत्तरीत आहे. नुकत्याच आलेल्या 'बेवॉच' चित्रपटातून पामेला चाहत्यांच्या भेटीला आली होती. तर, जॉन पीटर्स हे 'बॅटमॅन' च्या निर्मितीबद्दल ओळखले जातात.' (हेही वाचा, Kylie Jenner आपल्या कॉस्मेटिक्स व्यवसायातील 51% भागिदारी कोटी न्यूयॉर्क कंपनीला तब्बल 4320 कोटी रुपयांना विकणार)

पामेला एंडरसन हिने या आधी चार लग्न केली होती. रॉकर्स, टॉमी ली आणि किड रॉक अशी तिच्या या आधीच्या पतींची नावे आहेत. त्यानंतर तिने 2 वेळा प्रोफेशनल पोकर रिंक सॉलोमॉन याच्यासोबत विवाह केला. दरम्यान, आता ही अभिनेत्रीने हेअर स्टाइलिस्ट राहिलले प्रोड्युसर जॉन पीटर्स यांना आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे.

इन्स्टाग्राम पोस्ट

पामेला एंडरसन हिने जॉन पीटर्स याच्यासाठी एक प्रेमकविताही लिहिली आहे. तसेच, त्याला हॉलिवुडचा 'ओरिजनल बॅड बॉय' असेही संबोधले आहे. पामेलाच्या या कवितेचे नाव 'द ओरिजनल बॅड बॉय ऑफ हॉलिवुड' असे आहे. एंडरसन हिने हॉलिवुड रिपोर्टलला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, 'कोणतीही तुलना करता येणार नाही. ते शक्य नाही. मी त्याच्या कुटुंबावर अत्यंत निर्मळ प्रेम करते' दरम्यान, पामेला बिग बॉसच्या 4 हंगामात पाहुणी म्हणूनही झळकली होती.