नुकतेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हॉलीवूड अभिनेत्री नाया रिवेरा (Naya Rivera) आपल्या 4 वर्षाच्या मुलासह तलावाला भेट देण्यासाठी बाहेर गेली होती, यासाठी तिने भाड्याने एक बोटही घेतली होती. पण आता बातमी येत आहे की, नाया तलावामधून अचानक गायब झाली आहे. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये तिच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. या क्षणी अभिनेत्रीचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी अशा विचित्र परिस्थितीत पोलिसांना तिचा 4 वर्षाचा मुलगा बोटीमध्ये एकटाच तलावाच्या मध्यभागी सापडला.
अशा संशयास्पद परिस्थितीत हॉलिवूड स्टार नाया रिवेराच्या गायब झाल्याच्या बातमीने इंडस्ट्रीतील प्रत्येकाला धक्का बसला आहे. जर माध्यमांच्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, तिच्या बुडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्त पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सध्या तिचा शोध तलावामध्ये व त्याच्या आसपासच्या भागात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नायाने तिच्या 4 वर्षाच्या मुलासह बुधवारी दुपारी 3 तासासाठी कॅलिफोर्नियाच्या पेरु लेकमध्ये एक बोट भाड्याने घेतली होती.
तीन तासांनंतर, जेव्हा ही बोट वेळेत परतली नाही, तेव्हा कर्मचारी बोटीकडे पोहोचले, जिथे त्यांना नायाचा मुलगा 'जोसे' सापडला, परंतु नाया गायब होती. असे सांगितले जात आहे की, अभिनेत्री आपल्या मुलासह तलावामध्ये पोहत होती आणि फक्त तिचा मुलगाच बोटीपर्यंत पोहचू शकला. पोलिसांनी काल शोध आणि बचाव मोहीम हाती घेतली होती, परंतु अभिनेत्रीबद्दल काही माहिती मिळाली नाही. (हेही वाचा: हॉलीवूड अभिनेता टॉम क्रूझ ठरणार अंतराळात शुटींग करणारा पहिला अभिनेता; NASA प्रशासक जिम ब्रिडनस्टाईन यांनी दिली माहिती)
View this post on Instagram
दरम्यान, रिवेरा हॉलिवूडच्या बर्याच चित्रपटांमध्ये दिसली आहे. नाया तिच्या 'Glee' या हिट संगीताच्या मालिकेसाठी खूप प्रसिद्ध आहे. नायाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे तिच्या मुलावरील असलेले प्रेम दिसून येते. तिची शेवटची पोस्ट देखील तिच्या मुलासमवेत आहे.