अभिनेत्री नाओमी जुड हिचे निधन (Naomi Judd Passes Away) झाले आहे. ती 76 वर्षांची होती. अभिनय क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या निओमी (Naomi Judd) हिने अत्यंत मानाच्या समजल्या जाणारा ग्रॅमी पुरस्कार (Grammy Award) अनेकदा जिंकला होता. नाओमी हिची कन्या आणि अभिनेत्री एशले जुड हिने शनिवारी याबाबत माहिती दिली. शनिवारी एक निवेदन जाहीर करत अभिनेत्री एशले हिने म्हटले की, 'आज मी आणि माझ्या बहिणीने एक अत्यंत त्रासदायक अनुभव घेतला. आम्ही आमची आई गमावली आहे. आम्ही अत्यंत कोलमडून गेलो आहोत. आम्हाला अत्यंत खोलवर दु:ख झाले आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही आणि जनता तिच्यावर किती प्रेम करते.'
नाओमी हिचे पती आणि तिचे सहकारी गायक लॅरी स्ट्रिकलँड यांनीही एक निवेदन प्रसिद्ध करत माहिती दिली की, जुड हिचा टेनेसी येथील नॅशविले येथे निधन झाले. दरम्यान, नाओमी हिच्या मृत्यूनंतर कोणत्याही पद्धतीने सविस्तर स्पष्टीकरण करण्यात आले नाही. दु:खाच्या या क्षणी कुटुंबाकडून गोपनियतेचे अवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा,Oscars 2022 Winners List: सर्वोत्कृष्ट अभिनेत्यापासून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकापर्यंत ऑस्कर 2022 विजेत्यांची संपूर्ण यादी पहा येथे )
ट्विट
Multiple Grammy award winner Naomi Judd passes away at 76
Read @ANI Story | https://t.co/Z2rI4XEqFW#NaomiJudd #GrammyAward pic.twitter.com/FHiIzfSXuC
— ANI Digital (@ani_digital) May 1, 2022
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार 1980 आणि 1990 च्या दशकात जुड्स यांनी खूप साऱ्या सोलो गाण्यांची एक मालिकाच केली होती. ज्यामुळे सन 1994 मध्ये त्यांनी 12 गाण्यांचा एक अल्बम तयार केला. जो ग्रॅमी विजेता हिट व्हाई नॉट मी, मामा हीज क्रेजी यांसारख्या गाण्यांपेक्षाही अधिक लोकप्रिय झाला.