'जेम्स बॉण्ड' सीरिजची अभिनेत्री क्लॉडिन ऑगर यांचे निधन; 1958 मध्ये ठरली होती 'मिस वर्ल्ड'
Claudine Auger (PC- Getty)

'जेम्स बॉण्ड' (James Bond) सीरिजची अभिनेत्री क्लॉडिन ऑगर (Claudine Auger) यांचे निधन झाले आहे. क्लॉडिन यांनी जेम्स बॉण्ड मालिकेच्या 'थंडरबॉल' या चौथ्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. 78 वर्षीय क्लॉडिन यांनी पॅरिसमध्ये अखेरचा श्वास घेतला. क्लॉडिन यांना 1957 साली 'मिस सिनेमंड' आणि 1958 साली 'मिस वर्ल्ड'चा (Miss World) किताब मिळाला होता. क्लॉडिन यांनी 1958 मध्ये आपल्या चित्रपटसृष्टीतील करिअरला सुरुवात केली होती.

'क्रिस्टीन' हा क्लॉडिन यांचा पहिला चित्रपट होता. विशेष म्हणजे क्लॉडिन या 'जेम्स बॉण्ड' सीरिजमध्ये झळकलेल्या पहिल्या फ्रेंच अभिनेत्री होत्या. क्लॉडिन यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. 'ट्रिपल क्रॉस', 'द मेमॉयर्स ऑफ शेरलॉक होम्स,' आदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या.

हेही वाचा - Happy Birthday Govinda: बॉलीवूड अभिनेता गोविंदा याचा 'हा' रोचक जीवनप्रवास तुम्हाला माहित आहे का?

जेम्स बॉण्ड मालिकेचा 25 वा चित्रपट ‘नो टाइम टू डाई’ एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्स 3 वेगवेगळ्या प्रकारे चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रपटात एजंट 007 हे पात्र डॅनियल क्रॅग यांनी साकारलं आहे. डॅनियल यांनी जेम्स बॉण्ड सीरिजमध्ये प्रदीर्घ काळ मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली आहे.