
Happy Birthday Govinda: बॉलीवूडचा डान्सिंग स्टार अशी ओळख असलेल्या गोविंदाचा आज वाढदिवस. 21 डिसेंबर 1963 रोजी विरारमध्ये गोविंदाचा जन्म झाला. आज त्याचा 55 वाढदिवस साजरा होत आहे. बॉलीवूडमध्ये गोविंदा आपल्या नावानेच चर्चेत आहे. त्याचे आडनाव फार कमी लोकांना माहित आहे. गोविंदाचे पूर्ण नाव गोविंदा अरुण आहुजा, असं आहे. आपल्यातील उत्तम भूमिका कौशल्य, डान्स आणि कॉमेडीने त्यांने प्रेक्षकांची मने जिंकली. गोविंदाचे वडिल अरुण कुमार अहूजादेखील अभिनेते होते. त्याची आई निर्मला देवी अभिनेत्री आणि गायिका होती. गोविंदा आपल्या 6 भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. त्याला लाडाने सर्व 'ची ची', असं म्हणतात. खरं तर मागच्या काही काळापासून गोविंदाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. परंतु, आजही तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. बीकॉमची पदवी घेतल्यानंतर गोविंदाने त्याच्या वडिलांच्या सागंण्यावरुन सिनेसृष्टीत काम करायचं ठरवलं. गोविंदाने आपल्या करिअरची सुरुवात 'डिस्को डान्सर' या सिनेमापासून केली. या सिनेमानंतर गोविंदाने बराच काळ डान्सचा सराव केला. त्यानंतर त्याला कमर्शिअल जाहिरातींमध्ये काम करण्यासाठी ऑफर येऊ लागल्या.
गोविंदाची भूमिका असलेला चित्रपट 'इल्जाम' 1986 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात गोविंदाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याकाळी हा चित्रपट सुपरहिट झाला. या चित्रपटातून गोविंदाची डान्सिंग स्टार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली. गोविंदाने आतापर्यंत 165 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. गोविंदाला अनेक वेळा त्याच्या उंचीवरून ट्रोल करण्यात आले. पंरतु, तरीदेखील तो मागे हटला नाही. त्याचे चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. (हेही वाचा - अभिनेता गोविंदा याचा पुतण्या जन्मेंद्र अहुजाचा मृत्यू; राहत्या घरी सापडला मृतदेह)
'राजा बाबू,' 'कुली नंबर १,' 'साजन चले ससुराल,' 'हिरो नंबर १,' 'दुल्हे राजा,' 'स्वर्ग,' 'ऑन्टी नंबर १,' 'बडे मिया,' 'छोटे मिया,' 'जिस देश मे गंगा रहता है', 'नसीब', आदी चित्रपटांमध्ये गोविंदाने दमदार भूमिका केल्या. गोविंदाने शक्ती कपूर यांच्या बरोबर 42 चित्रपट तसेच कादर खान यांच्या बरोबर 41 चित्रपट केले. गोविंदाला त्याच्या उत्तम अभिनयामुळे 'मदर तेरेसा' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.