मॉडेलने केले कुत्र्याशी लग्न (संग्रहित संपादित प्रतिमा)

ब्रिटीश ब्रेकफास्ट शो ‘धिस मॉर्निंग’ (This Morning) च्या एका विचित्र एपिसोडमध्ये  एका माजी पेज 3 मॉडेलने तब्बल 221 लोकांना डेट केल्यानंतर, तिच्या 6 वर्षाच्या कुत्र्याशी लग्न केल्याची धक्कादायक गोष्ट घडली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या लग्नाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले आहे. एलिझाबेथ होड (Elizabeth Hoad) असे या मॉडेलचे नाव असून ती 49 वर्षांची आहे. इतक्या पुरुषांना डेट केल्यानंतर सध्या ती एका कुत्र्यासोबत कशी आनंदी आहे हे जाणून घेण्यासाठी तिला या शोमध्ये आमंत्रित करण्यात आले होते.

या शोद्वारे एलिझाबेथला प्रेक्षकांना सांगायचे होते की, जीवनांत नैराश्य आल्यावर शेवटी तिला लोगन (Logan) नावाच्या तिच्या  गोल्डन रिट्रीव्हर कुत्र्यामध्ये खरे प्रेम सापडले. होडने या शोचे होस्ट इमॉन होम्स (Eamonn Holmes) आणि रूथ लँग्सफोर्ड (Ruth Langsford) यांना सांगितले की, चार साखरपुडे तुटल्यानंतर आणि 221 पुरुषांना डेट करून बघितल्यावर तिने शेवटी तिच्या कुत्र्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे कुत्रे तिला एका शेल्टर होममधून मिळाले होते, मात्र तिने त्याला अगदी घरातल्या सदस्यासारखे वाढवले आहे. (हेही वाचा: धक्कादायक! कुत्रीच्या प्रेमप्रकरणामुळे मालकाचा संताप; शेजाऱ्या कुत्र्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्यामुळे घराबाहेर हाकलले)

याबाबत बोलताना एलिझाबेथ म्हणते, 'आमचे एकत्र येणे हे आमच्या नशिबात लिहिले होते. या लाग्नाद्वारे त्याने मला वाचवले आणि मी त्याला वाचवले. तो माझ्या आयुष्यात येण्याआधी मी आतून फार खचलेली होती. मात्र तो माझ्या आयुष्यात आल्यावर सर्वकाही बदलले'. मात्र अनेक लोकांनी या विवाहावर आक्षेप घेतला आहे. जनावरांना बोलता येत नाही त्यामुळे जबरदस्तीने हा विवाह घडला आहे. अशाप्रकारे मुक्या जनावरावर अत्याचार झाल्याचे मत अनेक लोकांनी व्यक्त केले आहे.