जेम्स बाँड ही व्यक्तीरेखा पडद्यावर साकारून ती अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते सर शॉन कॉनेरी (Sean Connery) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 90 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कॉनेरी यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. कॉनेरी यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. कॉनरी यांचा जन्म 25 ऑगस्ट 1930 रोजी ब्रिटनमध्ये झाला होता. 1962 ते 1983 या कालावधीतील त्यांनी बाँडपटांमध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरल्या होत्या.
सर शॉन कॉनेरी यांनी अनेक दशके हॉलिवूडच्या चित्रपटात काम केले आहे. रशिया वि्थ लव (1963) गोल्डफिंगर (1964),थंडरबॉल (1965) आणि यु ओन्ली लाईव्ह ट्वाइस (1967) अशा काही चित्रपटात त्यांनी काम केले. त्यानंतर 'द अनटचेबल' (1988) या चित्रपटात एका आयरिश पोलीसाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांना दोन बाप्टा आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते. परंतु, जेम्स बॉंड चित्रपटाने त्यांना अनोखी ओळख मिळवून दिली होती. त्यानंतर त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने 007 असेही म्हणायला लागले. हे देखील वाचा- UK 'Total Lockdown' From Next Week? ब्रिटेन मध्ये पुढच्या आठवड्यापासून पुन्हा कठोर लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता; ख्रिसमसपूर्वी दिवसाला 4000 मृत्यू होण्याचा वैज्ञानिकांचा इशारा
एएनआयचे ट्विट-
James Bond actor Sir Sean Connery dies at the age of 90: UK media pic.twitter.com/9rVjMBWxut
— ANI (@ANI) October 31, 2020
एका सर्वेक्षणानुसार, जेम्स बाँड साकारणाऱ्या नायकांमध्ये शॉन कॉनरी सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. त्यांना 44 टक्के लोकांनी शॉन कॉनरी यांना पसंती दर्शवली होती. तर टिमोथी डाल्टन आणि पिअर्स ब्रॉन्सन हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे जेम्स बाँड ठरले होते.