Avengers Endgame पाहून अतिउत्साहात दिला स्पॉइलर, चाहत्यांनी दिला बेदम चोप
Avengers Endgame (Photo Credits: Twitter)

Avengers Endgame Spoiler: कोणताही प्रतिक्षीत सिनेमा किंवा एखाद्या सीरिजचा एपिसोड प्रदर्शित झाल्यावर कोणीही त्याची कथा सांगून किंवा शेवट उघड करून इतरांचा रसभंग करू नये अशी चाहत्यांची इच्छाअसते. मात्र तरीही काही महाभाग अतिउत्साहात कथा सांगून जातात, हॉंगकॉंग (Hong Kong) मध्ये देखील काल अशीच एक घटना घडली, चित्रपटगृहातुन बाहेर आल्यावर एका अतिउत्साही व्यक्तीने अव्हेंजर्स एंडगेम (Avengers Endgame)  मधील अंतिम रहस्य सर्वांना ओरडून सांगितले.मात्र त्यानंतर जे घडले ते नवलच! लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार अव्हेंजर्स एंडगेम पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांनी स्पॉयलर्स दिल्याच्या रागात या व्यक्तीला चांगलाच चोप दिला.

‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’चा बहुचर्चित आणि प्रतिक्षीत अव्हेंजर्स एंडगेम भारतासह जगभरात प्रदर्शित झाला आणि चाहत्यांनी अक्षरशः या सिनेमाला डोक्यावर घेतलं. मार्व्हलच्या सीरिज मध्ये हा अंतिम भाग असल्याने या सिनेमात नेमकं काय होतंय हे पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक होते.   एकीकडे कोणीही कथा सांगून स्पॉईलर्स देऊ नये यासाठी  सिनेमाच्या टीमकडून #DONTSPOLENDGAME असे म्हणत आवाहन केले जात आहे.मात्र तरीही अनेक जण मुद्दाम कथा उघड करून स्पॉईलर्स देताना पाहायला मिळतात. काहींनी तर तिकीट मिळत नाहीत म्हणून या सिनेमा ऑनलाईन लीक करण्याचा ही प्रयत्न केला. 'Avengers Endgame'ला देखील ऑनलाईन पायरसीचे ग्रहण, 'Tamil Rockers' वर डाउनलोड लिंक्स उपलब्ध

चित्रपटाने केवळ दोन दिवसांत भारतात 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटासाठी पहिल्यांदाच भारतामध्ये 24  तास चित्रपटगृह सुरु राहिले. इतकंच नाही तर काही चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे 72 तास सलग शो सुरु आहेत.