Heart Of Stone: 'आलिया भट्ट'चे हाॅलिवूड चित्रपटात पदार्पण; ट्रेलरमुळे व्हिलनचा लुक पाहून चाहते म्हणाले शानदार,
aliya bhatt - file

Heart Of Stone: पहिल्यांदच अभिनेत्री आलिया भट्ट हाॅलिवूड चित्रपट सृष्टीत पाउल टाकणार आहे. आलिया भट्ट हीने आपल्या अनेक वेगवेगळ्या भुमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सध्या आलिया भट्ट तिच्या आगामी हाॅलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन ' ह्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  नुकतेच ह्या चित्रपटाचे फस्ट लुक व्हिडिओ प्रदर्शित ह्या चित्रपटात आलिया सोबत अभिनेता गॅल  गॅडोल आणि जेमी डोर्नन यांच्या प्रमुख भुमिका आहेत. आलिया या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ब्राझीलमध्ये आहे. ट्रेलरमधून आलिया भट्टचा अॅश्कन लुक पाहायला मिळाला आहे.

सोशल मिडियावर ह्या चित्रपटाचे लोक चांगलीच प्रशंशा करत आहे. बऱ्याच दिवसांनी आलिया भट्ट चित्रपटात काम करणार आहे. ट्रेलरवरून हा चित्रपट क्राइम थ्रीलर असल्याचे दिसून येत आहे. आलिया ह्या चित्रपटात गुप्त एजेंडची भुमिका साकारणार आहे. येत्या 11 ऑगस्टला हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर झळकरणार आहे. आलिया कोणत्याही भुमिकेत असली तरीही प्रेक्षकांवर तिची छाप पडतेच. (हेही वाचा- सुहाना खानच्या 'द आर्चीज'चा ट्रेलर लॉंच)

आलियाच्या ह्या ट्रेलरच्या धमाकेदार अॅक्शनमुळे प्रेक्षकांना वेड लावले. प्रेक्षकांना फार उत्सुकता लागली आहे. येत्या ऑगस्टमध्ये चित्रपटगृहात  तीन मोठंमोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलियाच्या ह्या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच हूरहूर लागली आहे.