Happy Birthday Subodh Bhave: 12 th Fail ते Superstar सुबोध भावे या प्रवासामधल्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
Happy Birthday Subodh Bhave | (File Image)

महाराष्ट्राचा सुपरस्टार सुबोध भावेचा आज वाढदिवस. 'अवंतिका' या मालिकेतील नायिकेचा भाऊ साकारण्यापासून सुरु केलेली कारकीर्द आज सुपरस्टार पदापर्यंत पोचली आहे. अनेक यशस्वी मालिका, चित्रपट आणि नाटके आपली गाडी दिग्दर्शनाकडेही वळवली. तिथेही 'कट्यार काळजात घुसली' हा पहिलाच चित्रपट हिट करून आपलं नाणं खणखणीत वाजवलं. तिन्ही माध्यमांमध्ये यशस्वीरीत्या कसं वावरायचं हे सुबोध कडून सगळ्या कलाकारांनी शिकण्यासारखं आहे. मोठ्या माणसाचा प्रवासही खडतरच असतो आणि बऱ्याचदा तो प्रवास कोणाला फारसा ठाऊक पडत नाही. काही गोष्टी कायम अंधारातच राहतात. आज आम्ही तुम्हाला सुबोधच्या काही अशा गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्हाला कदाचित ठाऊक नसतील. चला तर मग जाणून घेऊ काही बाबी: (हेही वाचा. नाट्यरसिकांच्या 'या' चुकीमुळे, अभिनेता सुबोध भावे करणार रंगभूमीला रामराम?)

1. 12 वीची परीक्षा सगळ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते. तशीच ती सुबोध भावेच्या आयुष्यात सुद्धा ठरली होती. याचं कारण म्हणजे 12 वी मध्ये बोर्डाच्या परीक्षेत तो भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात चक्क नापास झाला होता. नापास झाल्यावर कोणालाही दुख्खच होते. पण सुबोध भावेंच्या मते ती त्याच्या आयुष्यातली सर्वात चांगली घटना होती कारण त्यामुळेच तो अभिनयाकडे वळला.

2. सुबोधच्या आईवडिलांची अशी इच्छा होती की सुबोधने डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं, पण अभ्यासामध्ये सुबोधला काडीचाही रस नव्हता कारण त्याचं पहिलं प्रेम हे कायमच ऍक्टिंग राहिलेलं आहे.

3. सुबोधची पत्नी मंजिरी भावे ही भावे होण्यापूर्वी मंजिरी ओक होती आणि ती त्याची बालमैत्रीण होती. ती त्याच्याच शाळेत शिकलेली आहे आणि सुबोध मंजिरीच्या पाहताक्षणी प्रेमात पडला होता. तेव्हा तो दहावीत होता तर ती आठवीत.

4. तुम्हाला हे माहित आहे का की सुबोधने एक सेल्समन म्हणूनही काम केलेले आहे? सुरवातीच्या काळात पोटासाठी तो एकीकडे अभिनय आणि एकीकडे सेल्समन अशा दोन जबाबदाऱ्या पार पाडायचा. सकाळी एका छोट्या आयटी फर्ममध्ये काम करणारा सुबोध रात्री नाटकाच्या तालमी करायचा.

5. अगदी सुरवातीच्या काळात सुबोधची एक वाईट अभिनेता म्हणून हेटाळणी केली गेली होती. इतकेच नव्हे तर एका नाटकामधील काढून त्याच्यावर चक्क बॅक स्टेजची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

6. सुबोध अभिनयात निष्णात आहेच. पण त्याचसोबत त्याला खेळांमध्येही विशेष रस आहे. लहान असताना तो मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स आणि स्विमिंग करत असे.

तुझ्या पुढील वाटचालीसाठी आणि चिरंतन आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा आणि हैप्पी बर्थडे...