खळखळून हसवणारा The Kapil Sharma Show पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय? कृष्णा अभिषेक, भारती सिंह आणि किकू शारदाचे फोटो समोर आले
Krushna Abhishek, Kiku Sharda, Bharti Singh (Photo Credit: Instagram)

प्रसिद्ध कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ही माहिती वाचल्यानंतर 'द कपिल शर्माच्या शो'च्या चाहत्यांचा आनंद गगणात मावनार नाही. कारण, कपिल शर्माचा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या शोचे मुख्य अभिनेता कृष्णा अभिषेकने (Krushna Abhishek) त्याच्या कमबॅकबद्दल एक इशारा दिला आहे. नुकताच कृष्णाने या शोमधील कलाकार भारती सिंह (Bharti Singh) आणि किकू शारदासोबत (Kiku Sharda) काढलेला एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या तिघांचा फोटो समोर आल्याने कपिल शर्मा शो पुन्हा एकदा सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र, कृष्णानेही तो फोटो काही काळानंतर हटवून टाकला. परंतु, सेल्फी शेअर करताना असे लिहिले होते की, आम्ही लवकरच परत येणार आहोत, आमची पहिली क्रिएटिव्ह मीटिंग खूपच उत्साहित होणार आहे आणि काहीतरी नवीन येणार आहे. त्याचवेळी काही मीडिया रिपोर्ट्स दावा करत आहेत की, 21 जुलैपासून द कपिल शर्मा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. या वेळी हा शो एका नवीन रंगात आणि एका नवीन रंगाच्या रूपात असेल. ज्यामध्ये बरेच बदल पाहिले जाऊ शकतात. या बदलांमध्ये स्वरूपनातून काही चेहरे देखील बदलू शकतात. हे देखील वाचा- कोरोनाची लस घेताना Rakhi Sawant ने गायले तिचे नवे गाणे, व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू

मात्र, कपिलबरोबरच प्रमुख स्टारही या शोचा नक्कीच एक भाग असणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि लॉकडाऊनमुळे या शोचे प्रसारण बंद करण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, लहानांपासून तर थोरांपर्यंत द कपिल शर्मा शो चाहते आहेत. यामुळे हा शो पुन्हा कधी प्रसारित होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.