मुंबई... स्वप्नांचे शहर. या शहरात दररोज हजारो लोक बॉलीवूडमध्ये काहीतरी करण्यासाठी येत असतात. स्ट्रगल केल्यानंतर यश मिळाले, नाव झाली की प्रत्येकालाच शोध असतो तो आपल्या ड्रीम होमचा. मुंबईसारख्या शहरात स्वतःचे घर ही फार मोठी गोष्ट आहे. गगनाला भिडलेल्या किंमतीमध्ये स्वतःला हवे तसे, हव्या त्या ठिकाणी घर मिळणे हे दुरापास्त झाले आहे. याला सेलेब्जदेखील अपवाद नाहीत. सिद्धार्थ मल्होत्राचाही मनासारख्या घराचा शोध खूप काळापासून चालू होता. शेवटी पाली हिल सारख्या उच्चभ्रू भागात एका अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावर, 3 बेडरूमचा फ्लॅट त्याला मिळाला. अतिशय सुंदर अशा फ्लॅटचे इंटेरियरदेखील तितकेच सुंदर असणे आवश्यक आहे. यासाठी मदतीला धावली आहे सर्वात लोकप्रिय स्टार वाईफ, गौरी खान.
Thank u for the lovely virtual tour Sid... the house is looking great in the video! #GauriKhanDesigns @S1dharthM pic.twitter.com/smd02KPbxj
— Gauri Khan (@gaurikhan) November 5, 2018
आपल्या सर्वांनाच माहित आहे की, शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही एक यशस्वी इंटेरियर डिझाईनर आहे. तिनेच सिद्धार्थच्या या नव्या घराचे इंटेरियर केले आहे. अतिशय उत्तम रंगसंगती योजलेल्या या घराची एक झलक पाहताच तुम्ही या घराच्या प्रेमात पडाल. या संपूर्ण इंटेरियरमध्ये कुठेही भडकपणा जाणवत नाही, हेच याचे वैशिष्ठ्य आहे. हे घर सजवताना गौरीने भौमितिक डिझाईनचा वापर केला आहे. लिव्हिंगरूममध्ये सिद्धार्थच्या आवडत्या चित्रपटांची काही पोस्टर्स लावली आहेत. तसेच हॉलमध्ये वापरण्यात आलेलेल फर्निचरदेखील अतिशय खास आहे. गॅलरीमध्येही मोजकेच फर्निचर आणि झोपाळा ठेवण्यात आला आहे, इथे वापरण्यात आलेली लायटिंगदेखील आकर्षक आहे.
यापूर्वी गौरीने करण जोहरच्या मुलांची रूम सजवली होती. याशिवाय रणबीर कपूर, वरूण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही घरांचे इंटेरियर केले होते.