गणेशोत्सव हा सण संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज सर्वत्र गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. या उत्सवानिमित्त आपल्या कामातून वेळ काढून प्रत्येकजणच हा सण अगदी उत्साहात साजरा करतात. मग यात सेलिब्रेटी कसे मागे राहतील? मराठी सेलिब्रेटींनींही अगदी जल्लोषात बाप्पाचे स्वागत केले.
अभिनेत्री तेजश्री प्रधान, जुई गडकरी त्याचबरोबर अभिनेता सुबोध भावे, लोकेश गुप्ते, सिद्धार्थ चांदेकर यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले. तर पाहुया या सेलिब्रेटी बाप्पांची एक झलक....
अभिनेता लोकेश गुप्ते आणि चैत्राली गुप्तेच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. चैत्राली ही अभिनेत्री भार्गवी चिरमुलेची बहीण असल्याने भार्गवीने देखील बाप्पाचे दर्शन घेतले.
अभिनेत्री जुई गडकरीचा बाप्पासोबतचा खास फोटो.
अभिनेता सुबोध भावेचा बाप्पासोबत सेल्फी.
अभिनेत्री माधुरी दीक्षितने एका रियालिटी शोच्या सेटवर बाप्पाचे दर्शन घेतले.
अभिनेत्री तेजश्री प्रधान बाप्पाची पूजा करताना.
View this post on Instagram
चिंता, क्लेश, दरिद्र, दु:ख अवघे देशांतरा पाठवी... हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. #HappyLife
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या घरचा बाप्पा.