Bharat Jadhav यांच्या नावाचा गैरवापर करत सिनेमात कामाच्या संधीचं आमिष दाखवत आर्थिक फसवणूक होऊ शकते; अभिनेत्याने सावध राहण्याचा दिला सल्ला
Bharat Jadhav (Photo Credits: Instagran)

सिनेमा, नाटकं, सिरिअल आणि वेब शो साठी अनेकदा ऑडिशनची माहिती आता सोशल मीडीयामधून दिली जाते. पण यामध्ये आर्थिक फसवणूक होत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. नुकतीच अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) च्या नावाखाली अशाप्रकारे आर्थिक फसवणूक होत असल्याची घटना समोर आल्याचं भरत जाधव यांनी एका पोस्टद्वारा सांगितलं आहे. दरम्यान 'माझ्या कोणत्याही सिनेमाचं कुठेही ऑडिशन सुरू नसून भूलथापांपासून दूर रहा' असं आवाहन भरत जाधव यांनी केलं आहे.

भरत जाधव यांनी सोशल मीडीयामध्ये केलेल्या पोस्ट मध्ये 'काल एका व्यक्ती चा मेसेज आला की "तुमच्या सिनेमात काम करण्यासाठी मुंबईतील एका एजंटने आमची ऑडिशन घेतली व सिलेक्शन झाले असून फोटोशूट व पुढील प्रोसेसिंग फी च्या नावाखाली १५०००/- रुपयांची मागणी केली." असं म्हटलं. सध्या भरत जाधव यांचं अशाप्रकारे कोणतेही ऑडिशन सुरू नाही. 'सिनेमात काम मिळवून देतो असे आश्वासन देत असेल तर अशा भूलथापांना बळी पडू नका. कोणालाही पैसे देऊ नका. संबंधित व्यक्तींवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई होईल.' असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

भरत जाधव पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

दरम्यान भरत जाधव यांच्याप्रमाणेच अनेक कलाकारांच्या नावाखाली अशी खोटी आमिषं दाखवून पैशांची लूट केली जाते. दरम्यान लॉकडाऊन मध्ये अभिनेता सोनू सूद गरजवंतांना मदत करत होता. तेव्हा त्याच्या नावाचा देखील गैरफायदा घेत काहींनी पैसे उकळण्याचे धंदे केल्याचं पहायला मिळालं आहे.