महात्मा गांधी जयंती : या चित्रपटांमध्ये लपलेला आहे गांधीवादाचा संदेश
(Photo Credits: Facebook)

2 ऑक्टोबर, 1869 साली गुजरातच्या पोरबंदर येथ्ये जन्मलेल्या मोहनदास करमचंद गांधी यांची आज 150 वी जयंती. सत्य, अहिंसा, स्वावलंबनाचा संदेश देणाऱ्या बापूंच्या विचारांनी भारताला किंबहुना आजच्या तरुण पिढीला नक्कीच विचारांची योग्य दिशा दर्शवली. महात्मा गांधीच्या विचारांना देशभरात पोहचवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आणि त्याला आपल्या चित्रपटसृष्टीनेही मोलाची साथ दिली. या राष्ट्रपित्याच्या विचारसरणीला चित्रपटांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात आले. चला पाहूया मा.गांधी, त्यांचे जीवन आणि विचार यांच्याशी निगडीत काही चित्रपट

> गांधी (1982)

 

View this post on Instagram

 

3 ชั่วโมงเต็ม สำหรับการดู #Gandhi1982 #มหาตมาคานธี

A post shared by THANAYUT RUEANG - NU (@ptrphoomm) on

1982 मधील हा इंडियन-ब्रिटिश चित्रपट 'गांधी', ज्याचे दिग्दर्शन केले होते Richard Attenborough यांनी. या चित्रपटामध्ये अभिनेता बेन किंग्सली मुख्य भूमिकेत होते. चित्रपटामध्ये गांधीजींच्या जीवनातील साउथ आफ्रिकेपासून ते भारताचा स्वातंत्र्य लढा, तसेच त्यांच्या हत्येचा भाग दाखवण्यात आला होता. आजवरच्या प्रभावी चरित्रपटांमध्ये ‘गांधी’ या चित्रपटाची गणना होते.

> द मेकिंग ऑफ महात्मा गांधी (1996)

अतिशय सुंदर पद्धतीने गांधीजींचे आयुष्य या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते श्याम बेनेगेल. साउथ आफ्रिका जिथे गांधीजींनी सत्याग्रहाचा अवलंब केला, हा भाग अतिशय सविस्तरपणे या चित्रपटात दर्शवण्यात आला आहे.

> गांधी माय फादर (2007)

 

View this post on Instagram

 

#GandhiMyFather #AKFC #AnilKapoorFilmCompany #Nationalawardwinner #Firstfilmunderthebanner

A post shared by Anil Kapoor Film Company (@anilkapoorfilmcompany) on

2007 साली आलेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता दर्शन जरीवाला याने महात्मा गांधी यांची भूमिका साकारली होती. तर अक्षय खन्नाने गांधीजींचा मुलगा हरीलाल याची भूमिका साकारली होती. या चित्रपटात गांधीजींची राजकीय कारकीर्द तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रकाश टाकण्यात आला होता.  गांधीजी आणि त्यांचा मुलगा हरीलाल यांचे नाते हा या चित्रपटाचा केंद्र बिंदू होता.

> हे राम (2000)

2000 मधील हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेत बनला होता. या चित्रपटात कमल हसन, नसिरुद्दीन शहा यांच्या मुख्य भूमिका होत्या. साकेत राम म्हणजेच कमल हसन यांच्या आयुष्यावर महात्मा गांधी यांचा प्रभाव कसा पडतो याचं चित्रण या चित्रपटातून करण्यात आले होते.

> लगे रहो मुन्नाभाई (2006)

संजय दत्त आणि विद्या बालन यांच्या या कॉमेडी ड्रामा चित्रपटाला प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. मुन्नाभाईच्या आयुष्यावर, विचारांवर गांधीजींचा होणारा परिणाम या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.