Torrent, TamilRockers नव्हे तर ट्विटर वरच  LEAK  झाला शाहरूखच्या ZERO सिनेमाचा काही भाग!
Zero ( Photo Credits: Still )

Zero Movie LEAKED Online: शाहरूख खान (Shahrukh Khan), कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'झिरो' (Zero) आज प्रदर्शित झाला आहे. मात्र रिलिजच्या पहिल्याच दिवशीच या सिनेमाची पायरसी समोर आली आहे. आर्शचायाची गोष्ट म्हणजे सिनेमा तमिळ  रॉकर्स (TamilRockers) किंवा टोरेंट (Torrent) वर लिक झालेला नसून ट्विटरवरच या सिनेमामधील शाहरूख खानच्या एंट्रीचे काही भाग रिलिज करण्यात आले आहेत.

zero-movie-leaked
इंटरनेटवर लिक झालेल्या सिन्सचे काही शॉर्ट्स (Photo Credits: Twitter)

एका खोट्या ट्विटर अकाऊंटवरून सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान एक सीन लिक करण्यात आला आहे. ट्विटरवर फेक अकाऊंट बनवून या सिनेमातील काही फूटेज शेअर करण्यात आलं आहे.

फेक ट्विटर अकाऊंट ही बॉलिवूड कलाकार मनोज वाजपेयी, आमिर खान यांच्या नावाने बनवली आहेत. पायरसी चूकीचं असल्याचं अनेकदा सांगण्यात आलं आहे, याबाबत समाजात जागृती पसरवण्यासाठी काम सुरू आहे. मात्र प्रत्येक चित्रपटाच्या रीलिजनंतर पायरसीची निर्मात्यांना असते. काही दिवसांपूर्वी '2.0' या सिनेमासाठी त्यांच्या निर्मात्यांनी पायरसी रोखण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती.  2.0 सिनेमाला Piracy च्या धोक्याने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी Twitter वर खास आवाहन !

काही प्रसिद्ध फिल्म क्रिटिक्सच्या नावाचा वापर करून खोटे रिव्ह्यु पसरवण्याचा खोडसाळपणादेखील करण्यात आला आहे.