भयपटांचा ट्रेंड आणणारे दिग्दर्शक-निर्माते तुलसी रामसे काळाच्या पडद्याआड
तुलसी रामसे (Photo Credits: Twitter)

‘वीराना’, ‘बंद दरवाजा’, ‘पुरानी हवेली’,’आत्मा’ यांसारख्या भयपटांचे दिग्दर्शक निर्माते तुलसी रामसे (Tulsi Ramsay) यांचे आज निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्याने दिलेल्या माहितीनुसार रामसे यांच्या छातीत दुखू लागले, त्यानंतर त्यांना कोकिलाबेन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांनी रामसे यांना मृत घोषित केले. साधारण अडीच वाजता त्यांचे निधन झाले. हिंदी सिनेसृष्टीत हॉरर सिनेमाचा ट्रेंड आणणारे आणि रुजवणारे निर्माते असा तुलसी रामसे यांचा लौकिक होता. झी हॉरर शो ही एकेकाळी गाजलेली मालिकाही तुलसी रामसे यांनीच दिग्दर्शित केली होती.

बी ग्रेडचे अनेक सिनेमे तुलसी रामसे यांच्या नावावर आहेत. भय, अॅक्शन, रोमान्स, गाणी आणि सेक्स अशा सर्व मसालेदार गोष्टींचे मिश्रण त्यांच्या चित्रपटांमधून पाहायला मिळते, म्हणून त्याच्या चित्रपटांचा खास वेगळा असा प्रेक्षक वर्गही आहे. रामसे ब्रदर्स या नावाने त्यांचे चित्रपट लोकप्रिय होते.