COVID-19: देशात आणीबाणी लागू करा; बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी

कोरोना विषाणूचे (Coronavirus) वाढत्या प्रभावामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. करोनाच्या पार्श्वभुमीवर देशात आणीबणी जाहीर करा, अशी मागणी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी केली आहे. देशात आज हे होत आहे, उद्या काय होणार आहे? अशी भीती ऋषी कपूर यांनी व्यक्त केली आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकांने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे आदेश पाळणार नाही त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईही केली जात आहे. यामुळे ऋषी कपूर यांनी यापूर्वी सरकारकडे किमान संध्याकाळी सुरु करण्याची मागणी केली होती. देशात संचारबंदी लागू केल्यापासून ऋषी कपूर हे अधिकच चर्चेत आले आहेत.

कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात थैमान घातले आहे. यामुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पाश्वभूमीवर ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले आहेत की, “आज हे होत आहे, उद्या काय होणार आहे? म्हणूनच आपल्याला सैन्याच्या मदतीची गरज आहे असे मी म्हणतो आहे. आणीबाणी.” ऋषी कपूर यांनी याआधी देशभरात सुरु असलेल्या बनावट आणि अस्वच्छ मास्कच्या उत्पादनावरही बोट ठेवले होते. पत्रकार मधू तेहरान यांचे एक ट्विट रिट्विट करत त्यांनी त्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली होती. तेहरान यांनी काही ठिकाणी मास्कचे अत्यंत निकृष्ठपणे होणाऱ्या मास्क उत्पादनाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काही लोक बनावट मास्क, बनावट कोरोना चाचणी किट, तपासणी न केलेले व्हेंटिलेटर बाजारात विकत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला होता. तसेच यावर सरकारचे नियंत्रण आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. हे देखील वाचा- राज्यातील 18 लाख 89 हजार 528 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 11 हजार 966 कोटी 21 लाख रुपयांची कर्जमाफी रक्कम जमा - उपमुख्यमंत्री अजित पवार

ऋषी कपूर यांचे ट्वीट-

याआधी ऋषी कपूर यांनी ‘राज्य सरकारला उत्पादन शुल्क विभागाकडून पैशांची फार गरज आहे. संतापात नैराश्याची भर पडू नये. जसे आधी मद्यपान करायचे तसे लोक करतच आहेत तर कायदेशीर करून टाका. ढोंगीपणा करू नका. असे माझे विचार आहेत’, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले होते. त्यांच्या या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलसुद्धा केले होते. लॉकडाउनला कोणीच गंभीरपणे पाहत नाही, सेलिब्रिटीसुद्धा नाही, असे एका युजरने म्हटले होते. तर, काहींनी त्यांची खिल्लीसुद्धा उडवली होती.