देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले असून सरकारने लॉकडाउनचे आदेश येत्या 14 एप्रिल पर्यंत देण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी सुरु राहणार आहेत. त्यामुळे मॉल्स, स्विंमिंग पूल, रेस्टॉरंट, बार, चित्रपटगृह पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर पीव्हीआर (PVR) चित्रपटगृहाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लॉकडाउनंतर आता पीव्हीआर सिनेमागृहात सोशल डिस्टंसिंगचा (Social Destinacing) नियम पाळण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती द हिंदू यांनी दिली आहे.
सिनेमागृहात चित्रपट आपण पहायला जातो त्यावेळी तेथील सिट्स एकमेकांना चिकटून असतात. त्यामुळे काही वेळेस चित्रपट पाहताना चुकून स्पर्श सुद्धा होतो. मात्र सध्या कोरोना व्हायरस हा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने परसत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याचीच खबरदारी घेत आता पीव्हीआर सिनेमागृहाने सोशल डिस्टंसिंगचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय सिनेमागृहाने घेतला आहे. प्रेक्षकांना सुद्धा तिकिट खरेदी करताना या निर्णयाबाबत अधिक माहिती देण्यात येणार आहे. तसेच चित्रपट पाहताना दोन सिट्सच्या मध्ये एका सिट्सचे अंतर ठेवले जाणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. पण हा निर्णय काही महिन्यांपूर्तीच असणार असून त्यानंतर स्थिती पूर्ववत झाल्यानंतर पहिल्यासारखे करण्यात येणार आहे.(पुणे येथील उद्योजकाने तयार केले Sanitization Unit; 15 मिनिटांत नष्ट करणार 99.99% बॅक्टेरिया)