Chopsticks Trailer: Netflix च्या 'चॉपस्टिक' सिनेमाचा ट्रेलर रीलिज, मिथिला पालकर, अभय देओल प्रमुख भूमिकेत (Watch Video)
Chopsticks Trailer (Photo Credits: YouTube/Screengrab/ Netflix India)

नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स, लस्ट स्टोरीज सारख्या दमदार वेब सीरिजनंतर आता डिजिटल मीडियामध्ये नेटफ्लिक्स सिनेमांची देखील निर्मिती करत आहे. मराठमोळी मिथिला पालकर आता नेटफ्लिक्सच्या आगामी 'चॉपस्टिक' या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर रीलिज करण्यात आला आहे. मिथीला सोबत या सिनेमात अभय देओल (Abhay Deol),विजय राझ (Vijay Raaz) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. इथे पहा चॉपस्टिक सिनेमाचा टीझर 

चॉपस्टिक ट्रेलर

चॉपस्टिक सिनेमामध्ये मिथिला पालकर प्रमुख भूमिकेत आहे. तिची गाडी चोरीला जाते. ती पुन्हा मिळवण्यासाठी गॅगस्टरची मदत घेते. या प्रकारामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कार मिळवण्याच्या शोधामध्ये गोंधळ, गडबड यांच्यासोबत रंगणारी कॉमेडी रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारी ठरत आहे.

31 मे दिवशी चॉपस्टिक हा सिनेमा रिलिज होणार आहे. हिंदी सोबतच नेटफ्लिक्सने काही मराठी सिनेमांचीदेखील निर्मिती केली आहे. हा सिनेमा केवळ नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे.