Chopsticks Teaser: नेटफ्लिक्स च्या 'चॉपस्टिक्स' या चित्रपटातून पाहायला मिळणार मिथिला पालकर आणि अभय देओल यांची केमिस्ट्री
Mithila Palkar Photo Credit: (File Photo)

अनेक वेबसिरिज सिरिज, मालिका, मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिथिला पालकर(Mithila Palkar) पुन्हा एकदा एका नेटफ्लिक्सच्या 'चॉपस्टिक्स' (Chopsticks) ह्या चित्रपटामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नेटफ्लिक्स (Netflix)ची ही पहिली भारतीय फिल्म आहे. अलीकडेच ह्या फिल्मचा टीजर प्रदर्शित झाला. ह्यात मिथिला बरोबर प्रथमच बॉलिवूड अभिनेता अभय देओल (Abhay Deol) दिसणार आहे. चॉपस्टिक्स च्या टीजरमधून ह्या दोघांची भूमिका खूपच वेगळी आणि हटके असल्याचे आपल्याला  पाहायला मिळेल.  31 मे ला हा चित्रपट आपल्याला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन यार्डी (Sachin Yardi) यांनी केले आहे. सचिनने ह्या आधी 'क्या कूल है हम' (Kya Kool Hai Hum) आणि 'सी कंपनी' (C Kkompany) हे चित्रपट केले आहेत. ह्या चित्रपटात अभिनेत्री मिथिला निरमा सहस्त्रबुद्धे ह्या मुलीची भूमिका साकारत आहे, जी चीनी पर्यटकांसाठी एका टूर गाइडचं काम करताना ह्या टीजरमधून दिसतेय.

मिथिला पालकरने साकारलेली निरमा ही भूमिका खूपच लाजरी आणि घाबरट दाखवली. तिची नवीन कार जेव्हा हरवते तेव्हा ती कार कशी शोधून काढते, तसेच अभय देओल व्यतिरिक्त आणि कोण कोण तिला ही कार शोधण्यास मदत करतो, ते ह्या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

नेटफ्लिक्स वरील 'मिसेज सीरियल किलर' या आगामी वेबसिरीजमधून जॅकलिन फर्नांडिस करणार डिजिटल डेब्यू

मिथिला पालकर सोशल मिडियावर सुपरस्टार आहे. जिने लिटिल थिंग्स, गर्ल इन द सिटी सारख्या वेबसीरिजमधून काम करुन लोकांमध्ये स्वत:ची अशी वेगळी छाप सोडली. मिथिला ने आपले कप साँग्स यूट्युबवर वायरल झाल्यानंतर सोशल मिडियावर ती खूप लोकप्रिय झाली होती. तिने मुरांबा ह्या चित्रपटात देखील काम केले आहे.