बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) लवकरच नेटफ्लिक्स (Netflix)आगामी वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. 'मिसेज सीरियल किलर' (Mrs. Serial Killer)या थ्रिलर वेबसिरीजमधून ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर पर्दापण करणार आहे. या वेबसिरीजची निर्मिती फराह खान (Farah Khan) यांनी केली असून याचे दिग्दर्शन फराहचे पती शिरीष कुंदर (Shirish Kunder) करणार आहेत.
या वेबसिरीजबद्दल फराह खान हिने सांगितले की, "जॅकलिन आमच्या 'मिसेज सीरियल किलर' या वेबसिरीजमधून डिजिटल डेब्यू करेल. या वेबसिरीजबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. यातून आम्ही प्रेक्षकांसमोर काहीतरी नवीन आणि अनपेक्षित आणू इच्छित आहोत."
तर जॅकलिन फर्नांडिस हिने ट्विट करत वेबसिरीज बद्दल उत्सुक असल्याचे नमूद केले. तिने लिहिले की, "नेटफ्लिक्स ओरिजनल 'मिसेज सीरियल किलर' ही माझी वेबसिरीज लवकरच येत असल्याने मी अत्यंत खूश आहे. वेबसिरीज अतिशय मजेदार असेल."
जॅकलिन फर्नांडिस पोस्ट:
View this post on Instagram
Mrs. Serial Killer 🖤🖤. @netflix_in @farahkhankunder @shirishkunder @srishtibehlarya @netflix 🖤🖤🖤
'मिसेज सीरियल किलर' ही वेबसिरीज वर्षाअखेरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.