ठाकरे चित्रपट (Photo credit : youtube)

फक्त महाराष्ट्राच्याच नाही, तर भारताच्या राजकारणातील एक दिग्गज आसामी म्हणजे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray). आज इतक्या वर्षांनंतर बाळासाहेबांच्या नावाचा दरारा अजूनही पाहायला मिळतो. अशा या शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या जीवनावर आधारीत सिनेमा येऊ घातलाय. 'ठाकरे' (Thackeray) असे या चित्रपटाचे नाव असून, प्रत्येकालाच या सिनेमाची उत्सुकता आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीच हा ट्रेलर सेन्सॉरच्या कचाट्यात अडकला आहे. ट्रेलरमधील तीन संवाद आणि काही प्रसंगांवर सेन्सॉरने आक्षेप घेतला आहे.

दाक्षिणात्यांविरोधात शिवसेनेच्या आंदोलनादरम्यान यांडुगुंडू या शब्दाचा वापर करण्यात आला होता. ज्याचा उल्लेख चित्रपटात असल्याचं सांगण्यात येत असून त्यावर सेन्स़ॉरने आक्षेप घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा चित्रपट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची निर्मिती आहे. सेन्स़ॉरने आक्षेप घेतला तरी हा ट्रेलर ठरल्या वेळेत प्रदर्शित होईल अहि भूमिका राऊत यांनी घेतली आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. तर अभिजित पानसे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 23 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.